Shahrukh Khan Family : SRK ने फॅमिली फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

shahrukh khan family
shahrukh khan family
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याच्या पत्नीने (Shahrukh Khan Family) आपल्या फॅमिलीसोबत सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत शाहरुखने एक खास बातमीदेखील शेअर केलीय, जे पाहून चाहत्यांना खूप उत्सुकता लागून राहिलीय. (Shahrukh Khan Family)

गौरी खानने दिली गुड न्यूज

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची पत्नी नेहमी चर्चेत राहते. पेशाने ती इंटीरियर डिझायनर आणि बिझनेस वुमन आहे. गौरी खान नेहमी प्रगती करण्यावर विश्वास ठेवत असते. आता गौरी खान आपल्या जीवनाच्या या सीरीजमध्ये माय लाईफ इन डिजाईन नावाचे आपले पुस्तकाची घोषणा केलीय.

पुस्तक होणार लॉन्च

गौरी खानने आपला डेब्यू बुकची घोषणा केलीय. या पोस्टमध्ये तिने आपल्या परिपूर्ण फॅमिलीची एक झलक दाखवलीय. या फोटोमध्ये गौरी खान आणि शाहरुख खान आपल्या तीन मुलांसोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये किंग खान खूप स्टायलिश दिसत आहे. संपूर्ण फैमिली ब्लॅक ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे. गौरी खान ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत असून शाहरुख खानने ब्लॅक जॅकेट आणि पँट्स परिधान केलीय. मुलांनीदेखील मॅचिंग केले आहे.

आर्यन आणि अबरामदेखील ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहेत. सुहाना खानने व्हाईट कलर टॉप आणि बेल बॉटम पॅट परिधान केलीय. परिवार ते आहे जे घर बनवते कॉफी टेबल बूकसाठी एक्सायटेड आहे…लवकरच येत आहे.

अनेक कलाकारांनी गौरी खानला शुभेच्छा दिल्या आहेत. श्वेता बच्चन, अमृता अरोरा, मनीष मल्होत्राने हार्ट इमोजी शेअर करून अभिनंदन केले आहे. सर्वांना गौरीच्या पुस्तकाची खूप प्रतीक्षा लागून राहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news