Parineeti-Raghav Chadha : 'राजकीय प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल नको' | पुढारी

Parineeti-Raghav Chadha : 'राजकीय प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल नको'

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा मुंबईत आम आदमी पक्षाचे प्रसिद्ध नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांचा मुंबईतील रेस्टॉरंट बाहेरील व्हिडिओ व्हायरल होताच चर्चेला उधाण आलं आहे.  (Parineeti-Raghav Chadha)दोघेही एकत्र स्पॉट झाल्याने त्यांच्या रिलेशनशीपची चर्चा सुरु आहे. यानंतर संसदेबाहेर प्रसारमाध्यमांनी राघव यांना परिणीतीविषयी विचारलं त्यावेळी राघव यांनी मला राजकीय प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल नको सांगत वेळ मारून नेली. यावेळी ते हसतानाही दिसले. प्रसारमाध्यमांना समजावत ते पुढे निघून गेले. (Parineeti-Raghav Chadha)

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना ‘इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील व्यक्तींना हा सन्मान पहिल्यांदाच कुणाला मिळाला आहे. यूकेच्या मँचेस्टर स्कूलची परिणिती चोप्रा विद्यार्थिनी आहे. दुसरीकडे, राघव चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून प्रशिक्षण घेतले आहे. दोघेही अभ्यासात टॉपर होते. अशा परिस्थितीत असे देखील होऊ शकते की दोघे चांगले मित्र आहेत. पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर परिणीती सध्या सिंगल आहे, तर राघवही अद्याप बॅचलर आहेत.

दोघेही एकत्र कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर झाले होते. हे फोटो समोर आल्यानंतर युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यादरम्यान राघव पांढऱ्या शर्ट आणि पॅन्टमध्ये तर परिणीतीही पांढऱ्या शर्ट आणि चेक पॅन्टमध्ये दिसली.

साभार – video – Ram Singh twitter

Back to top button