

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी-बंगाली चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन झाले. त्यांचे वय ६८ वर्षे होते. (Pradeep Sarkar) ते दीर्घकाळापासून किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि त्यांचे डायलिसिसही सुरू होते. गुरुवारी दुपारी अडीजच्या सुमारास त्यांना त्रास जाणवत होता. त्यांच्या पोटॅशियमची पातळी खूपच कमी झाली होती. प्रकृती गंभीर झाल्याने रात्री तीनच्या सुमारास त्यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या खूप प्रयत्नानंतरही त्यांना वाचवता आले नाही आणि रात्री साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. (Pradeep Sarkar)
अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्रदीप सरकार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. अजय देवगणने लिहिले की, 'दादा' या प्रदीप सरकारच्या निधनाची बातमी आपल्यापैकी काहींना पचवणे अजूनही अवघड आहे. मी माझ्या मनापासून शोक व्यक्त करतो. माझ्या प्रार्थना मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. RIP दादा."
प्रदीप सरकार यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ च्या सुमारास सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चित्रपट निर्माते असण्यासोबतच ते प्रसिद्ध जाहिरात चित्रपट निर्माते देखील होते, ज्यासाठी त्यांनी अनेक मोठे पुरस्कार जिंकले. त्यांच्या 'परिणिता' या चित्रपटात बिद्या बालन, संजय दत्त आणि सैफ अली खान सारखे कलाकार होते. नंतर त्यांनी राणी मुखर्जीसोबत 'लागा चुनरी में दाग', 'मर्दानी' आणि 'लफंगे परिंदे' सारखे चित्रपट केले. तसेच काही वेब सिरीजचे दिग्दर्शनही केले. आजकाल तो दिवंगत अभिनेत्री प्रिया राजवंशचा बायोपिक बनवण्याच्या तयारीत होता.
'भूल भुलैया', 'इश्किया'पासून भूतकाळात प्रदर्शित झालेल्या 'शेरनी' आणि 'जलसा'पर्यंतचा विद्या बालनच्या प्रत्येक अभिनय उत्कृष्ट अभिनयाचे उदाहरण आहे. पण या दमदार अभिनेत्रीसाठी पहिला हिंदी चित्रपट मिळणे ही एक कठीण गोष्ट होती. अखेरीस 'परिणिता' दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी निर्माता विधू विनोद चोप्रा यांना एक छोटासा बदल सुचवला. ज्यामुळे ऑडिशनमध्ये अनेकदा नाकारण्यात आलेल्या विद्याला तिचा पहिला हिंदी चित्रपट मिळण्यास मदत झाली होती.