Akshay Kumar: अॅक्शन सीनचे शूटिंग करताना अक्षयकुमार जखमी | पुढारी

Akshay Kumar: अॅक्शन सीनचे शूटिंग करताना अक्षयकुमार जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना स्कॉटलंडमध्ये घडली. अभिनेता टायगर श्रॉफसोबत अॅक्शन सीनचे शूटिंग करताना अक्षयकुमारच्या गुडघ्याला दुखापत झाली. मात्र, अक्षयने शूटिंग थांबवले नाही. जखमी अवस्थेत शुटींग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आणि अ‍ॅक्शन सिक्‍वेन्‍स साठी क्लोज-अप शॉट्ससह शूटिंग सुरू ठेवले.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अक्षय कुमार ( Akshay Kumar) टायगरसोबत अॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना स्टंट करताना ही दुखापत झाली. ही दुखापत गंभीर नाही, सध्या त्याच्या गुडघ्यावर ब्रेसेस आहेत. अॅक्शन दृश्यांचे शुटींग थांबवून बाकीच्या क्लोज-अप्स  शूटींग सुरू ठेवले आहे. स्कॉटलंडचे शेड्यूल पूर्ण होण्यास विलंब होऊ नये म्हणून अक्षयने स्वत: हा निर्णय घेतला.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या भूमिका आहेत. स्कॉटलंडला जाण्यापूर्वी मुंबईत पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. ‘टायगर जिंदा है’, ‘सुलतान’, ‘भारत’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘गुंडे’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखला जाणारा अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

हेही वाचा 

Back to top button