Sai Tamhankar : सांगलीच्या सई ताम्हणकरला 'मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार | पुढारी

Sai Tamhankar : सांगलीच्या सई ताम्हणकरला 'मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सई ताम्हणकरला यंदाचा झी मराठी चित्रगौरव २०२३ ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार जाहीर झालाय.  (Sai Tamhankar) अनेक ज्येष्ठ कलाकारांसोबत तरुण पिढीतल्या कलाकारांचा देखील गौरव केला जाणार आहे. (Sai Tamhankar)

या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार, ह्यावर्षी या पुरस्काराची मानकरी ठरली ती म्हणजे ग्रेसफुल सांगलीची कन्या ‘सई ताम्हणकर’.

सई ताम्हणकर फक्त एक उत्कृष्ट कलासंपन्न अभिनेत्रीच आहे असे नाही ती एक उत्तम ऑरेंज बेल्ट कराटेपटू आणि राज्यस्तरीय कब्बडीपटू देखील आहे.

सई ताम्हाणकरचा अभिनय प्रवास अनेक वेगवेगळ्या धर्तीचे हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरीज असं अव्याहत सुरु आहे. चित्रपटातल्या हिरोएवढंच महत्व हिरोईनला मिळायला हवं असं नेहमीच म्हणतात. पण खूपदा सई हिरो पेक्षा जास्तीचा भाव खाऊ जाते. फक्त सईसाठी चित्रपट पाहणारे लाखो चाहते आहे. असं असूनही सई एकच प्रकारच्या भूमिकेत न अडकता विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये ती चमकली.

sai tamhankar
sai tamhankar

Back to top button