

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलाकार रीवा अरोराने आपले १० मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्यानंतर आनंद साजरा केला. तिने एक नवी चमचमती Audi Q3 खरेदी केली. (Riva Arora) या कारची किंमत देशात ४४ लाख रुपयांहून अधिक आहे. तिने या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यानंतर फॅन्स तिचे अभिनंदन करत आहेत. तर काही जण तिला ट्रोल देखील करत आहेत. (Riva Arora)
रीवाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ब्लॅक ऑडी लक्झरीच्या चारी बाजूला पोज देताना दिसते. रीवाने आपल्या पोस्टला कॅप्शन दिलीय, "मला माहिती आहे की, मला उशीर झाला आहे. पण अखेर माझे १० मिलियन इन्स्टा परिवाराला माझे नवे गिफ्ट @audiin सोबत @nishriv_ आणि @jyotiwadhwa ने साजरा केला. खूप-खूप धन्यवाद. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. मी माझा आनंद व्यक्त नाही करू शकत. माझ्या १० मिलियन इन्स्टा परिवाराचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. आपल्या सर्वांचे धन्यवाद. हे वास्तवात माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहेत."
तिच्या पोस्टवर प्रशंसकांनी अभिनंदन सोबत कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तर काही युजर्स या गोष्टीमुळे चिंतेत आहेत की, रीवाकडे लायसेन्स आहे?