Taapsee Pannu : तापसीला देवीची प्रतिमा असलेले दागिने घालणे पडले भारी | पुढारी

Taapsee Pannu : तापसीला देवीची प्रतिमा असलेले दागिने घालणे पडले भारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या चित्रपटांसोबत फॅशन सेंसमुळे लाईमलाईटमध्ये राहते. (Taapsee Pannu) त्याचसोबत स्पष्टोक्ती साठी तापसी ओळखली जाते. आता तापसी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय. आपल्या लेटेस्ट फोटोशूटमुळे तिला ट्रोल केले जात आहे. तिने डीप-नेक आऊटफिटसोबत अशी ज्वेलरी घातलीय, जे पाहून सोशल मीडिया युजर्सचा पारा चढला आहे. लोक तिला ट्रोल करत आहेत. (Taapsee Pannu)

तापसी पन्नूने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिवा रेड कलरची सेक्विन डीप-नेक आऊटफिटमध्ये दिसत आहे. य़ाचसोबत तिने कर्ली शॉर्ट केस मोकळे सोडले आहेत. तसेच लाईट-ग्लासी मेकअपमध्ये खूप सुंदर दिसतेय. पण, तिचा मेकअप लूक सोडून ज्वेलरीवर टिकली आहे.

तापसी पन्नूने या बोल्ड आऊटफिटसोबत देवीची प्रतिमा असणारी हेवी ज्वेलरी गळ्यामध्ये घातली आहे. पण, तिचा ड्रेस फार बोल्ड आहे. त्यावर तिने हे हेवी नेकलस घातलाय, जे नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. लोकांना या आउटफिटसोबत नेकलेसची केलेली निवड अजिबात आवडलेली नाही. त्यामुळे तापसीला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

तिने सुपर सिजलिंग फोटोशूटचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय-‘यह लाल रंग कब मुझे छोड़ेगा’. तापसीच्या या फोटोला आतापर्यंत इन्स्टाग्राम वर्ल्डमध्ये लाखों लाईक्स मिळाले आहेत. परंतु, कमेंट सेक्शनमध्ये पॉझिटिव्हहून अधिक निगेटिव्ह कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

तापसी पन्नूच्या या फोटोवर एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिलं की, ‘तापसीला लाज वाटली पाहिजे. संपूर्णपणे घृणास्पद…कोणत्याही धर्माच्या प्रतीकला आपण कसे प्रतिनिधित्व करता, हे आपणांस एका सेलिब्रिटीच्या रूपात माहिती असायला हवं.’ दुसऱ्या एका युजरने लिहिलंय-‘अशा वल्गर ड्रेसवर मां लक्ष्मीचे हार घातलाय, लाज नाही वाटली.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

Back to top button