ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | पुढारी

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन; ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज शनिवारी (दि.१८) सकाळी ६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी १२ वाजता कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोल्हापूर- कळंबा येथील शिवप्रभू नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून सकाळी साडेअकराच्या सुमारास अंत्ययात्रा निघणार आहे.

 भालचंद्र कुलकर्णी
भालचंद्र कुलकर्णी

भालचंद्र कुलकर्णी : ३०० हून अधिक चित्रपटात काम

भालचंद्र कुलकर्णी यांनी मर्दानी (१९८३), मासूम (१९९६), झुंज तुझी माझी (१९९२), हळद रुसली कुंकू हसलं (१९९१), माहेरची साडी (१९९१) या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. नवरा नको गं बाई, सोंगाड्या, पिंजरा, थरथराट, मुंबईचा जावई, खतरनाक या चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे.

कुलस्वामिनी अंबाबाई चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे गाणं त्यांच्या चित्रित झाले होते. हे गाणे खूप गाजलं होतं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांना चित्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

हे ही वाचा :

Back to top button