Nana Patole : तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका ! नाना पटोले
मुंबई पुढारी वृत्तसेवा : बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांचा मीरा रोड येथे दिनांक १८ व १९ मार्च २०२३ रोजी एक कार्यक्रम होत असल्याची माहिती आहे. धिरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणारे विधान करुन लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला राज्य सरकारने परवानगी देऊ नये अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (Nana Patole)
महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. अंधश्रद्धेला आपल्या राज्यात अजिबात थारा नाही. महाराष्ट्राने तसा कायदाही केला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या तसेच संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथील कार्यक्रमाला परवानगी दिल्यास जनतेची दिशाभूल करून त्यांच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळ मांडला जाऊ शकतो असेही पटोले म्हणाले.
हेही वाचा
- मनरेगाकडून कोपरगावास 2.30 कोटी; आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यास अखेर आले यश
- Kolhapur News : तुम्हाला एक, दीड लाख पगार, कशाला हवी पेन्शन, कोल्हापुरात बेरोजगारांनी काढला मोर्चा (व्हिडिओ)
- ST bus discount : महिलांसाठी आनंदाची बातमी! आजपासून एस.टी. बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत
- Twitter का मागू शकत नाही संरक्षण?, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर केंद्रानं कोर्टात स्पष्टच सांगितलं

