‘एनसीबी’चे माजी अधिकारी समीर वानखेडेंवर येणार बायोपिक | पुढारी

'एनसीबी'चे माजी अधिकारी समीर वानखेडेंवर येणार बायोपिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवुडमधील अनेक निर्माते बायोपिकवर काम करत आहेत. आता अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर चर्चेत आलेले ‘एनसीबी’चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बायोपिक बनवली जाणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग या वर्षाच्या शेवटी सुरु करण्यात येणार आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक ‘मैं अटल हूं’च्या निर्मात्यांपैकी एक असलेला झीशान अहमद हे समीर वानखेडे यांच्या बायोपिकची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाच्या लेखन टीममध्ये टीव्ही पत्रकार निधी राजदानचाही समावेश असून, समीर वानखेडे यांच्याशी झालेल्या संवादावर या चित्रपटाचा मुख्य आधार बनवला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

समीर वानखेडे यांचा बायोपिक लिहिणाऱ्या प्रीतम झा यांच्या मतानुसार, या चित्रपटात वानखेडे यांच्या आयुष्याशी संबंधित पैलू सांगण्यात येणार आहेत, ज्याबद्दल अजूनही लोकांना माहिती नाही. चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या कास्टिंगचे काम सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. समीर यांच्या भूमिकेसाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांशी बोलणे सुरु असल्याचे बोलले जात आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्‍ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. या प्रकरणी आर्यन खान याची निर्दोष मुक्‍तता झाली. तर वानखडे यांची ‘एनसीबी’मधून उचलबांगडी करण्‍यात आली होती. दरम्यान, याप्रकरणात समीर वानखेडे आणि त्यांच्या विभागावर टीकाही झाली. याप्रकरणात आर्यन खान याची निर्दोष मुक्तता झाली. त्यामुळे समीर वानखेड वादातही सापडले होते.

हेही वाचा :

Back to top button