Mobile Number : मोबाईलधारकांना दिलासा! प्रमोशनल कॉलसाठीचा १० अंकी क्रमांक होणार बंद | पुढारी

Mobile Number : मोबाईलधारकांना दिलासा! प्रमोशनल कॉलसाठीचा १० अंकी क्रमांक होणार बंद

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : टेलीमार्केटिंग कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) एक नवीन नियम जारी केला आहे. त्यानुसार १० अंकी नोंदणी नसलेले मोबाईल क्रमांक येत्या ५ दिवसात बंद होतील. १६ फेब्रुवारी रोजी एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, अनोंदणीकृत मोबाईल नंबरवरून कॉल करण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता पुढील ५ दिवसांत १० अंकी प्रचारात्मक संदेश, जे प्रमोशनल कॉलिंगसाठी वापरले जातात ते बंद केले जातील.

ट्रायने ग्राहकांना त्रास देणारे प्रमोशनल मेसेज पाठवण्याविरोधात पाऊल उचलले आहे. TRAI ने एका अहवालात सांगितले आहे की, १० अंकी मोबाईल नंबर प्रमोशनसाठी वापरता येणार नाही. वास्तविक सामान्य कॉल्स आणि प्रमोशनल कॉल्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे नंबर जारी केले जातात. या सामान्य आणि प्रचारात्मक कॉल ओळखले जाऊ शकतात.

काही टेलिकॉम कंपन्या नियमांविरोधात १० अंकी मोबाइल नंबरवरून प्रचारात्मक संदेश आणि कॉल करत आहेत. ट्रायच्या नव्या आदेशानुसार, सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांना ५ दिवसांत नियम लागू करावे लागतील. यानंतर, नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास ५ दिवसांच्या आत 10 अंकी क्रमांकावर कॉल करणारे प्रमोशन बंद केले जाईल.

हेही वाचा :

Back to top button