Rinku Rajguru : आर्ची-परश्याचं गुलाबी प्रेम❤️; रिंकूच्या पिंक साडीला लागली नजर... | पुढारी

Rinku Rajguru : आर्ची-परश्याचं गुलाबी प्रेम❤️; रिंकूच्या पिंक साडीला लागली नजर...

पुढारी ऑनलाईन न्यूज : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीला कोण ओळखत नाही. आर्ची म्हणजे, मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू ( Rinku Rajguru ) होय. रिंकूनं कमी कालावधीत खूपच लोकप्रियता मिळविली आहे. तिने सैराटसोबत अनेक चित्रपटात उत्तम अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनयासोबत रिंकू तिच्या एकापेक्षा एक हटके स्टाईलचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या तिच्या आणखी एका पारपंरिक पद्धतीच्या साडी लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. काही क्षणातच २५ हजारांच्या आसपास चाहत्यांनी लाईक्स केलं आहे.

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू  (Rinku Rajguru) नुकतेच संन्डे स्पेशल आणि रंगपंचमीच्या मुहुर्तावर पिंक कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील खास म्हणजे, तिने पिंक लूकसोबत पिंक रंगाच्या गुलाबाचा वापर केला आहे. पिंक साडीवर तिने त्याच रंगाचे ब्लॉऊज परिधान केलं आहे. केसांचा आंबाडा, केसांत पिंक रंगाचे गुलाब, कानात गुलाबी इअररिग्स, हातात पिंक गुलाब, गळ्यात गुलाबी रंगाचा हार, एका हातात बांगड्या आणि एका हातात घड्याळ, पिंक लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

या साडीत तिने कधी खुर्चीत बसून तर कधी लाजत- मुरडत पोझ दिली आहे. रिंकूची एक झलक पाहण्यास चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. रंगपंचमीच्या मुहूर्तावर रिंकूने शेअर केल्याने हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. यावर चाहत्यासह ‘सैराट’ फेम अक्षय ठोसर आणि मराठी अभिनेत्री साजली संजीवने ईमोजी शेअर करून भरभरून कौतुक केलं आहे. दरम्यान आर्ची परश्या म्हणजे, अक्षय ठोसरच्या प्रेमात पडली असल्याचे बोलले जात आहे.

‘Nice pic 😍’, ‘महाराष्ट्राची अप्सरा 🔥🔥❤️❤️’, ‘Preety❤️’, ‘आर्ची- परश्याचं गुलाबी प्रेम❤️’, ‘God bless you Rinku be happy 😊’, ‘तु लय भारी दिसती ❤️❤️’, ‘आर्चे तु खराब झाली गं.😂’, ‘Rinku looking cute in pink 💗’, ‘कातील अदा 🌹❤️’, ‘Lay bhari’, ‘रुपाची चांदणी’, ‘छान दिसते ❤️💕🌸’, ‘Ohh Ma’am😍😍😍🔥🔥’, ‘Cuteness overload 😘❤’, ‘Sparkling Saree Wala Swag Look 😍’, ‘Ufff❤️‍🔥’, ‘So nice look darling ❤️’, ‘Sundari😍’, ‘So cute darling ❤️❤️’, ‘Pic credit goes to your beauty and overwhelming behaviour 😍’, ‘Marvelous Smily beautyful heart breaking Girl’, ‘So beautiful ❤️’, ‘Cute ❤️’, ‘😍😍 So Pretty ❤️❤️’, ‘नजर लागेल तुला एवढी गोड आहेस’, ‘तुझे डोळे आणि smile… बहर आहे…’; ‘कोन जास्त सुंदर आहे.. गुलाब फुल की रिकू 😂😂❤️❤️’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. या फोटोला १ तासात २५ हजाराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

Back to top button