Satish Kaushik Death: पोलिसांना कौशिक यांच्या फार्महाऊसवर सापडली औषधांची पाकिटे

Satish Kaushik
Satish Kaushik
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवनवीन अपडेट्स येत आहेत. सतीश (Satish Kaushik Death) यांचा मृत्यू हार्टॲटॅक आल्याने झाला होता. आता या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येतेय. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. सतीश कौशिक राहत असलेल्या फार्म हाऊसमधून पोलिसांना 'औषधांची पाकिटे' सापडली. (Satish Kaushik Death)

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या पथकाने फार्म हाऊसवर जाऊन तपासणी केली. फार्महाऊसवरून त्यांनी 'आक्षेपार्ह औषधांची पाकिटे' ताब्यात घेतली. आता सतीश कौशिक यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकं काय झालं हे समजणार आहे.

होळीला आलेल्या पाहुण्यांची यादी तयार

पोलिसांनी होळी पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची यादी तयार केली. त्यावेळी फार्महाऊसमध्ये जे जे पाहुणे, कलाकार उपस्थित होते, त्यांची ही यादी आहे.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news