Vidya Balan
Vidya Balan

Vidya Balan : विद्याचा टॉपलेस फोटोशूट, पाहणाऱ्यांना फुटला घाम (Photos)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन चित्रपट इंडस्ट्रीत बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या करिअरमध्ये विद्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Vidya Balan ) विद्या सध्या चित्रपटापासून दूर आहे, पण सोशल मीडियावर ती नेहमीच ॲक्टिव्ह असलेली दिसते. विद्या जवळपास प्रत्येक दिवशी इन्स्टाग्रामवर फॅन्ससोबत फनी रील्स शेअर करत राहते. आता तिचा एक सुपर बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर असा लूक पाहून अनेकांना घाम फुटला आहे. विद्या बालनने बॉलीवूडचा प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी टॉपलेस फोटोशूट केला आहे. (Vidya Balan )

या फोटोशूटमध्ये विना कपडे पोज देताना दिसतेय. तिन वृत्तपत्राने स्वत:ला कव्हर केलं आहे. अभिनेत्रीचा फोटो डब्बूने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, विद्या विदाऊट क्लॉथ्स एका कॉफी टेबलाजवळ बसलेली आहे.

विद्याच्या एका हातात कॉफी मग आणि दुसऱ्या हातात वृत्तपत्र घेऊन पोज देताना दिसत आहे. तिने गॉगल घातला आहे. अभिनेत्रीने खुल्या कर्ली केस आणि ग्लॉसी मेकअपने आपला लूक कम्पलीट केला आहे. अनेक दिवसांनंतर विद्याचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

विद्याचा फोटो पाहून अनेकांना घाम फुटला आहे. या फोटोवर फॅन्सचे सातत्याने कमेंट्स येत आहेत. यावर कमेंट करून अनेक युजर्स विद्या बालनचे कौतुक करत आहेत. तर अनेकजण तिला ट्रोल करतानादेखील दिसत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, 'कुणाकडे lighter आहे का?' दुसऱ्या युजरने लिहिलं, 'आता पंखा लावतो'. तर आणखी एकाने लिहिलं, 'खूपचं सुंदर फोटो आहे.'

काही लोकांना विद्याचा हा लूक अजिबात आवडला नाही. त्यांनी खूप निगेटिव्ह कमेंट केले. एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं की, 'एडल्ट चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे.' याशिवाय आणखी एका युजरने लिहिलं की, 'कपडे तर घालायचे फोटोशूटसाठी.' विद्या बालन लवकरचं मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news