Pathaan Record : 'पठान'ने तोडला 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड | पुढारी

Pathaan Record : 'पठान'ने तोडला 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर पठानचा जलवा अद्यापही कायम आहे. (Pathaan Record) अलिकडेच रिलीज झालेला कार्तिक आर्यनचा चित्रपट शहजादा बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही. पण बॉक्स ऑफिसवरील बादशाह शाहरुखच्या पठानची जादू मात्र कायम आहे. दरम्यान, ३८ व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड केला आहे. यावेळी पठानने एसएस राजामौलीच्या बाहुबली २ ला मागे टाकले आहे. (Pathaan Record)

शुक्रवारी बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले. रिपोर्टनुसार, पठानने हिंदी भाषेत ३८ व्या दिवशी ५११.७५ कोटींची कमाई केलीय. ऑल इंडिया भाषांमध्ये मिळून ५२९.४४ कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्डवाईड चित्रपटाची एकूण कमाई १०२९ कोटी झालीय.

बाहुबली-२ ला मागे टाकलं

सहाव्या आठवड्यात शुक्रवारी पठानने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत प्रभास स्टारर बाहुबली २ च्या हिंदी व्हर्जनला मागे टाकलं आहे. शाहरुख खानने चार वर्षांनंतर सिल्व्हर स्क्रीनवर सिद्धार्थ आनंद द्वारा दिग्दर्शित पठानसोबत वापसी केलीय. बॉक्स ऑफिसवर पठान ब्लॉकबस्टर झालाय. बाहुबली २ च्या हिंदी वर्जनने बॉक्स ऑफिसवर ५१०.९९ कोटी रुपये व्यवसाय केला होता. पठानने सहाव्या आठवड्यात ५११. ७५ कोटींची कमाई केली.

Back to top button