Aryan Khan : हाय प्रोफाईल ड्रग्‍ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानच्‍या मुलाची चौकशी - पुढारी

Aryan Khan : हाय प्रोफाईल ड्रग्‍ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानच्‍या मुलाची चौकशी

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या मोठ्या जहाजावरील ड्रग्‍ज पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्‍यात आली आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अद्‍याप अटक झालेली नाही, मात्र त्‍याची चौकशी सूरु असल्‍याचे एका इंग्रजी वेबसाईटने म्‍हटले आहे.

कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर २ व ३ ऑक्टोबरसाठी मुंबई-गोवा-मुंबई ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. या क्रूझवर उच्चभ्रूंचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यात ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली.

मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजामध्ये ड्रग्ज पार्टी होणार असल्याची खात्रीशीर माहिती एनसीबीच्या हाती लागली होती. या आधारावर एनसीबीच्या एका पथकाने प्रवासी बनत त्या जहाजामध्ये प्रवेश मिळवला होता. दरम्यान ही जहाज समुद्रात गेल्यानंतर काही वेळात कारवाईला सुरूवात केली. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कार्डेलिया या जहाजावर ग्रीन गेटजवळ ही कारवाई करण्यात आली.

आर्यन खानचा मोबाईल फोन जप्‍त

आर्यन खान (Aryan Khan ) हा बॉलीवूड सुपरस्‍टार शाहरुख खान याचा मोठा मुलगा आहे.

एनसीबीने या पार्टीचे आयोजन करणार्‍या सहा जणांना समन्‍स बजावले आहे.

एनसीबीच्‍या सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आर्यन खान याचा फोन जप्‍त करण्‍यात आलेला आहे. त्‍याने या ड्रग्‍ज पार्टीपूर्वी कोणाशी संपर्क केला होता. त्‍याचा या प्रकरणाची संबंध आहे का, तसेच त्‍याने ड्रग्‍जचे सेवन केले होते का, याची एनसीबी चाौकशी करत आहे.

ramdas kadam audio clip : रामदास कदम, प्रसाद कर्वे आणि सोमय्या यांच्यातील कथित संवाद जसाच्या तसा !

ड्रग्‍ज पार्टीमध्‍ये सहभक्षागी होण्‍यासाठी आलेल्‍या दिल्‍लीतील तीन युवतींनाही ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

या युवती दिल्‍लीतील प्रसिद्‍ध व्‍यापार्‍यांच्‍या मुली असल्‍याचे समजते.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली आहे.

तब्बल सात तासांपासून ही कारवाई सूरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान जहाज समुद्राच्या आतमध्ये गेल्यावर ड्रग्ज पार्टीला सुरूवात झाली.

यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर होत असल्याचे निर्दशनास आल्यावर एनसीबीकडून कारवाईस सुरूवात झाली.

एनसीबीचे पथक प्रवासी बनून गेल्याने या कारवाईचा मागमुस कोणालाही लागला नसल्याने सर्व संशयितांना रंगेहाथ पकडण्यात मदत झाली.

शुक्रवारीच एनसीबीने केले होते

५ कोटींचे ड्रग्‍स जप्‍त शुक्रवारी ( दि १) एनसीबीने ऑस्‍ट्रेलियास पाठविण्‍यात येणार्‍या ड्रग्‍जचा पर्दाफाश केला होता.

तब्‍बल ५ कोटींचे ड्रग्‍ज जप्‍त केले होते. हैदराबादमधून हे ड्रग्‍ज पाठविण्‍यात आले होते.

हेही वाचलं का?

Back to top button