

शेतातील शेजारच्या घरी जेवायला निघालेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. गोकुळ शिवाजी दहिफळे (वय १८) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या रेवकी शेतवस्तीवर शिवाजी दहिफळे यांचे कुटूंब राहते.सध्या पितृपंधरवाडा असल्याने त्यांचा शेजारी बंडू राऊत यांच्याकडे गोकुळ दहिफळे शनिवार (दि. ०२)सायंकाळी जेवणासाठी जात होता.
नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. जेवायला निघालेल्या गोकुळचा विद्युत तारेचा जबर धक्का बसला.
शेतातून गेलेल्या वीज पोलवरून वीज जोडणी घेतलेले वायर खाली हाेती. ती हातात घेताच गोकुळ यास विजेचा जबर धक्का बसला.
तो गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ बीड जिल्ह्यातील गेवराई उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले.
गोकुळ दहिफळेचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे पंचक्रोशीतील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
हेही वाचलं का?