Virat Kohli : अनुष्का माझी मोठी प्रेरणा, तिने केलेल्या त्यागापुढे मी काहीच नाही | पुढारी

Virat Kohli : अनुष्का माझी मोठी प्रेरणा, तिने केलेल्या त्यागापुढे मी काहीच नाही

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं अप्रतिम बॉन्डिंग नेहमीच पाहायला मिळतं. एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय जणू विराटलाही आला आहे. एका मुलाखतीत विराटने (Virat Kohli) अनुष्का विषयी भरभरून सांगितले. त्यांच्या आयुष्यात एक नन्ही परीदेखील आलीय. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांच्या सुंदर बॉन्डने अनेकांना प्रेरणा दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान विराटने अनुष्काने केलेल्या त्यागाचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘गेल्या दोन वर्षांत ज्याप्रकारे गोष्टी घडत आहेत, आम्हाला मूलदेखी झाले आहे आणि एक आई म्हणून तिने केलेला त्याग खूप मोठा आहे. तिच्याकडे बघून मला जाणवले की, मला जे काही प्रॉब्लेम होते ते काहीच नव्हते. जोपर्यंत अपेक्षांचा संबंध आहे, जोपर्यंत तुमचे कुटुंब तुमच्यावर प्रेम करत असेल, तोपर्यंत तुम्ही फारशी अपेक्षा करू नका.” (Virat Kohli)

विराट म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रेरणा शोधता तेव्हा तुम्ही घरापासून सुरुवात करा. साहजिकच अनुष्का माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. माझ्या आयुष्याचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा होता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता, तेव्हा तुमच्यात बदल होतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगळा होतो. चांगल्यासाठी बदलासाठी आणि अनेक गोष्टी स्वीकारण्यासाठी बदल स्वीकारला.”

Back to top button