MURDER BENGALURU : धक्कादायक! लग्नाला नकार देणा-या प्रेयसीवर 16 वेळा चाकूने सपासप वार करून खून | पुढारी

MURDER BENGALURU : धक्कादायक! लग्नाला नकार देणा-या प्रेयसीवर 16 वेळा चाकूने सपासप वार करून खून

पुढारी ऑनलाइन डेस्क : MURDER BENGALURU :  लग्नाला नकार दिल्याच्या रागातून आपल्या पूर्व प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बंगळुरमध्ये घडला. ही घटना पूर्व बंगळुरमध्ये मुरुगेशपल्ल्या येथे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

लीला पवित्रा नलामती (वय 25, काकीनाडा), असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून ती मुरुगेशपल्या येथील ओमेगा हेल्थकेअर मॅनेजनमेंट सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड येथे कार्यरत होती. तर आरोपी दिनाकर बनाला (वय 28, डोमलूर श्रीकाकुलम) येथील रहिवासी आहे. MURDER BENGALURU

याप्रकरणी MURDER BENGALURU डीसीपी भीमाशंकर एस गुलेड यांनी अधिक माहिती दिली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी दिनकर आणि मयत लीला हे दोघेही पाच वर्षांपूर्वी प्रेमात पडले. ते दोघेही एकाच हेल्थकेअर फर्ममध्ये काम करत होते. दोघांनाही विवाह करायचा होता. मात्र, मुलीचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते कारण दिनकर वेगळ्या जातीचा होता. त्यामुळे लीलाने दिनाकरला माझे कुटुंबीय लग्नासाठी तयार नसून त्यांच्या विरोधात जाऊन मी लग्न करणार नाही, असे सांगितले. नंतर लीला हीने ओमेगा हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोकरी जॉईन केली. ती जेबीनगर येथे पीजीमध्ये राहत होती.

MURDER BENGALURU लग्नाला नकार दिल्याचा राग आरोपी दिनाकर याने डोक्यात ठेवला. मंगळवारी सायंकाळी तो तिच्या ऑफिस सुटण्याआधीच बाहेर येऊन थांबला होता. ती ऑफिसमधून बाहेर पडताच त्याने तिला गाठले. दोघांमध्ये यावेळी वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या दिनकर याने चाकू काढला आणि सर्वांदेखतच लीला हिच्यावर चाकूने 16 पेक्षा जास्त वार केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जीवन भीमा नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिनाकरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी

Sanjay Raut vs Bacchu Kadu : “निष्ठेच्या नावाखाली तुम्ही बेवफाई केली”; संजय राऊतांचा बच्चू कडुंवर निशाणा

Back to top button