

पुढारी ऑनलाईन डेस्क ; दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री सामंथा अक्किनेनी आणि अभिनेता नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य यांचे २०१७ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. मात्र आता या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या विषयीची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
सामंथा आणि नागा यांनी एक पोस्ट लिहिली आहे. पती-पत्नी म्हणून आमचे रस्ते वेगळे होत आहेत, मात्र आम्ही मित्र म्हणून राहू अस त्यांनी म्हटल आहे.
सामंथाने आपल्या इंस्टाग्राम वर आपल्या चाहत्यांच्या नावे एक पोस्ट लिहिली आहे. आमच्या प्रिय शुभचिंतकांनो खूप विचार करून मी आणि चैतन्य ने पती-पत्नी च्या नात्यातून विलग होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या दोघांमधील मैत्रीचे हे नाते गेल्या १० वर्षांपासूनचे आहे. आमच्या नात्यासाठी ही दोस्ती महत्वाचा आधार होती. या पुढे ही आमच्या मध्ये एक खास नाते ठेवेल.