पार्टीला गेल्यानंतर गुंगीचे औषध पाजून बलात्कार; खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मित्रासोबतही ठेवायला लावले शरीरसंबंध

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पार्टीला गेल्यानंतर बिअरमध्ये गुंगीचे औषध टाकून एकाने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्रासोबत देखील शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील चंदगनर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी मयुर दत्तात्रय सातव (वय.21,रा. आव्हाळवाडी, सातवआळी वाघोली) याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र शशिकांत कदम (रा. सोमनाथनगर वडगावशेरी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लोहगाव येथील 20 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च ते जुलै 2022 या कालावधीत सोमनाथनगर वडगावशेरी व केसनंद येथील हॉटेलमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी शिक्षण घेते. नोकरीच्या शोधात असताना एका मैत्रीणीच्या माध्यमातून तिचा आरोपी शशिकांत याच्यासोबत परिचय झाला होता. त्यावेळी त्याने तो स्पा सेंटर सुरू करणार असून, तिला तेथे मॅनेजर म्हणून नोकरी देतो असे सांगितले. त्यातूनच ओळख वाढत गेल्यानंतर एकेदिवशी पार्टीला तरुणीला तो घेऊन गेला. तेथे बिअरमध्ये गुंगीचे औषध टाकून ते तरुणीला पाजून बलात्कार केला. त्याने खासगी क्षणातील फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. जेव्हा तरुणीला जाग आली, तेव्हा त्याने तिला हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तो वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. काही दिवसानंतर शशिकांत याने तरुणीला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याचा मित्र मयुर याच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मयुर याने देखील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने त्याच्यासोबतचे संबंध तोडले होते. मात्र, त्यानंतर देखील तो वारंवार तरुणीला फोन करून पाठलाग करत त्रास देत होता. त्यामुळे सतत होणार्‍या त्रासाला कंटाळून तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून मयुर सातव याला अटक केली असून, त्याच्या फरार मित्राचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पालवे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news