पुढारी ऑनलाईन डेस्क : जावेद अख्तर यांनी 'पाकिस्तानला खरे-खोटे सुनावल्यानंतर सगळीकडे त्यांची चर्चा झाली. देशभरात जावेद यांचे कौतुक झाले. एकीकडे त्यांच्या हिमतीची दाद दिली जात असताना दुसरीकडे पाकिस्तानात अनेक सेलेब्रिटींना मिरची लागली आहे. ते जावेद यांच्या विरोधात बोलत आहेत. यामध्ये गायक अली जफरचे नावदेखील समोर आले आहे. विशेष म्हणजे, य़ाआधी अलीने जावेद अख्तर यांचे भरभरून कौतुक केले होते. पण त्यामुळेच त्याच्याच देशात पाकिस्तानात त्याच्यावर टीका होत आहे, ज्यामुळे अली जफरने आपले बोल बदलले आहेत.
काही दिवसांपूर्वी अली जफर (Ali Zafar) ने जावेद अख्तर यांच्यासमोर '1942: ए लव्ह स्टोरी' चित्रपटातील हिट गाणे 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' को गायलं होतं. याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. जफरने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'युनिव्हर्सने माझं फेव्हरेट लव्ह सॉन्ग महान जावेद अख्तर आणि लव्ह ऑफ माय लाईफ आयेशा फाजली (अलीची पत्नी) यांच्यासमोर गाण्याची संधी दिली.'
या पोस्टनंतर लोकांनी अली जफरला खरे-खोटे सुनावले. तेव्हा अली म्हणाला की, तो या कार्यक्रामात उपस्तित नव्हता. त्याने Javed Akhtar यांच्या कॉमेंटचा उल्लेख केला.
अली जफरने इन्स्टाग्राम स्टेटस शेअर केला. 'मित्रांनो मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. वास्तवात मी तुमचे कौतुक आणि टीकेला देता हूं, लेकिन मैं हमेशा एक बात का अनुरोध करता हूं कि किसी भी निष्कर्ष या फैसले पर पहुंचने से पहले तथ्यों की पुष्टिमहत्त्व देत सांगू इच्छितो की, कोणत्याही गोष्टीची आधी पुष्टी करावी. मी Faiz मेळाव्यात उपस्थित नव्हतो. तिथ काय घडलं हे मला दुसऱ्या दिवशीपर्यंत माहिती नव्हतं, जोपर्यंत मी सोशल मीडिया पाहिलं नाही.'
अलीने पुढे लिहिलं, 'मी एक पाकिस्तानी असल्याचा अभिमान आहे आणि पाकिस्तानी आपला देश वा लोकांविरोधात कोणतेही शब्द काढणार नाही…'