निर्माते आनंद एल राय यांच्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ची बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रशंसा | पुढारी

निर्माते आनंद एल राय यांच्या 'आत्मपॅम्फ्लेट'ची बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रशंसा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आनंद एल राय हा नेहमीच एक धडाकेबाज चित्रपट निर्माता राहिला आहे ज्याने नेहमीच अनेक शैलींमध्ये जुगलबंदी केली आहे. त्यांच्या आत्मपॅम्फ्लेट चित्रपटाची ७३ व्या बर्लिन चित्रपट महोत्सवात निवड करण्यात आली आहे. यावर निर्माता आनंद एल राय यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आनंद एल राय म्हणाले, “मी ७३ व्या बर्लिन चित्रपट महोत्सवात आलो आहे आणि आत्मपॅम्फलेटच्या प्रदर्शनानंतर, प्रेक्षकांनी उत्तम कथानकाची प्रशंसा केली. प्रादेशिक सिनेमातील हे माझे पहिले पाऊल आहे आणि याला आधीच जागतिक यश मिळाले आहे. जागतिक प्रेक्षक जेव्हा तुमचे साक्षीदार होतात, तेव्हा ही अभिमानाची भावना असते. आपण काम करतो आणि त्याची प्रशंसा करतो. प्रादेशिक सिनेमा जागतिक नकाशावर कोरणे हा अभिमानाचा क्षण आहे. सर्वांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञ आहे”.

आत्मपॅम्फ्लेटचे लेखन परेश मोकाशी यांनी केले असून दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी केले आहे.

Back to top button