बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन कधी प्रोफेशनल तर कधी पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून ऋतिक रोशन हा सबा आझादला डेट करत आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ऋतिक हा सबा आझाद हिच्यासोबत विदेशात गेला होता. इतकेच नाही, तर सबा आझाद हिने काही फोटोही शेअर केले होते. ऋतिक आणि सबा यांची जोडी अनेकांना आवडत नाही. यांच्या फोटोला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. ऋतिक आता 'रामायण' या चित्रपटाचा भाग नसणार आहे. 'रामायण' या चित्रपटामध्ये ऋतिक हा महत्त्वाच्या भूमिकेत होता. मात्र, अचानक ऋतिक हा या चित्रपटामध्ये काम करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ऋतिकने आपला मोर्चा परत एकदा 'क्रिश -4' या चित्रपटाकडे वळवला आहे. अगोदर 'रामायण' चित्रपट हातामध्ये असल्याने त्याने 'क्रिश-4' चित्रपटाकडे थोडेसे दुर्लक्ष केले होते. ऋतिकने संपूर्ण फोकस हे 'क्रिश -4' चित्रपटाकडे दिले आहे. वडील राकेश रोशन यांच्यासोबत चर्चा करून चित्रपटाचे काम लवकर कसे करता येईल, यावर ऋतिकने चर्चा केली.