Shahrukh Khan : शाहरुखने नयनताराला केलं किस, चेन्नईमध्ये दोघे…(Video) | पुढारी

Shahrukh Khan : शाहरुखने नयनताराला केलं किस, चेन्नईमध्ये दोघे...(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : पठानच्या यशानंतर शाहरुख खान (Shahrukh Khan) जवानचे शूटिंग करण्यासाठी चेन्नईमध्ये पोहोचला. शनिवारी शाहरुख आणि साऊथ दिग्दर्शक एटलीसोबत एसआरके चेन्नईला रवाना होताना दिसला. आता चेन्नईमधील शाहरुख खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये किंग खान अभिनेत्री नयनताराला किस करताना दिसत आहे. दोघे एकमेकांना गुडबाय म्हणताना दिसत आहेत. (Shahrukh Khan)

नयनतारा-किंग खानने केला Kiss

एका फॅन पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. शाहरुख खान-नयनतारा एकत्र दिसत आहेत. शाहरुख एका कारमध्ये बसलेला दिसत आहे. चारी बाजूंनी गर्दी दिसत आहेत. बाहेर नयनतारा उभी असलेली दिसते. शाहरुख गाडीचा दरवाजा उघडतो आणि नयनताराच्या गालावर किस घेतो. तिला गुडबाय म्हणून गाडीत बसतो. यावेळी शाहरुख खानने ब्लॅक टी-शर्ट आणि मॅचिंग पँट्स परिधान केलेले दिसते. त्याने गॉगलही घातलेला दिसतो.

नयनतारा आणि शाहरुख खान एकत्र चित्रपट ‘जवान’मध्ये काम करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन एटली करत आहेत. चित्रपटामध्ये साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती असेल. ‘जवान’चे शूटिंग सप्टेंबर २०२२ मध्ये सुरू झाले होते. शूटिंग पुणे, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये झाली आहे. ‘जवान’ २ जून २०२३ रोजी रिलीज होईल. यामध्ये दीपिका पादुकोण, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

दोघांच्या मैत्रीवर फॅन्सचे कमेंट

फॅन्स दोघे स्टार्सच्या मैत्रीवर खूप खुश झाले आहेत. काही फॅन्सचं म्हणणं आहे की, यालाच मैत्री म्हणतात. एका युजरने लिहिलं, ‘लेजेंड्सना एकमेकांना गळाभेट घेणे आणि किस करताना पाहणं किती छान आहे.’ दुसऱ्या एका युजरने लिहिलं, ‘चेन्नईमध्ये आपलं स्वागत आहे सुपरस्टार.’

Back to top button