Priyanka Chahar Chaudhary :बिग बॉसमध्ये प्रियंकाला मिळाली इतकी रक्कम अन् मोठी ऑफर | पुढारी

Priyanka Chahar Chaudhary :बिग बॉसमध्ये प्रियंकाला मिळाली इतकी रक्कम अन् मोठी ऑफर

पुढारी ऑनलाईन डेस्क : रॅपर एमसी स्टॅनने बिग बॉस १६ मध्ये चमचमती ट्रॉफी आपल्या नावे केली. सोबतचं ३१ लाखांची रक्कम जिंकली. तर शिव ठाकरे रनरअप आणि प्रियंका चौधरी फर्स्ट रनरअप ठरले. (Priyanka Chahar Chaudhary ) तुम्हाला माहितीये का, प्रियंका ही बिग बॉसची विजेती ठरेल, असे म्हटले जात होते. त्यामुळे तिचे फॅन्स खूप नाराज होते. पण, प्रियंकाला मिळालेल्या मोठ्या रकमेमुळे तिचे फॅन्स खूश आहेत. (Priyanka Chahar Chaudhary)

प्रियंकाने इतकी जिंकली रक्कम

प्रियंका चहर चौधरी बिग बॉस १६ जिंकू शकली नसली तरी तिने २५ लाख रुपये जिंकल्याचे म्हटले जात आहे. इतकचं नाही तर तिला श्रद्धा कपूरच्या जाहिरातीत काम करण्याची संधीदेखील मिळाली. खरंतरं एका ब्युटी कंपनीने बिग बॉस १६ शोच्या दरम्यान एक सौंदर्य स्पर्धा ठेवली होती. तिने ही स्पर्धा जिंकली. स्पर्धेच्या शर्थींनुसार तिने २५ लाख रुपये कमावले.

Priyanka Chahar Chaudhary
Priyanka Chahar Chaudhary

इतकचं नाही तर प्रियंकाच्या झोळीत चित्रपटही पडला आहे. रिपोर्टनुसार, तिला शाहरुख खानच्या डंकी चित्रपटात भूमिका मिळालीय. सलमान खान आणि साजिद खान सोबत काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली होती. हे ऑफर्स मिळाल्यानंतर आपण म्हणू शकतो की, ती हा शो हारूनदेखील जिंकली आहे.

Back to top button