Ram Charan : कॅन्सरग्रस्त मुलाची इच्छा रामचरणने केली पूर्ण, इमोशनल फोटो समोर | पुढारी

Ram Charan : कॅन्सरग्रस्त मुलाची इच्छा रामचरणने केली पूर्ण, इमोशनल फोटो समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणचे काही फोटोज भावूक करणारे आहेत. (Ram Charan) या फोटोंमध्ये रामचरण आपल्या छोट्या फॅनला भेटताना दिसत आहे. हा मुलगा कॅन्सरशी लढा देत आहे. दरम्यान, या छोट्या मुलाची इच्छा रामचरणने पूर्ण केलीय. ( Ram Charan)

‘आरआरआर’ फेम साऊथ सुपरस्टार रामचरणचे काही फोटोज फॅन्सना इमोशनल करणारे आहेत. या फोटोंमध्ये रामचरण आपल्या ९ वर्षाच्या फॅनशी बोलताना दिसत आहेत. हा मुलगा कॅन्सरशी झुंज देत आहे. तो राम चरणचा मोठा फॅन आहे. रामचरणला भेटण्याची तीव्र इच्छा या मुलाने व्यक्त केली होती. रामचरणने रुग्णालयात जाऊन त्याची इच्छा पूर्ण केली.

रुग्णालयातील भेटीचे रामचरणचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही इमोशनल व्हाल. राम चरणने केवळ आपल्या फॅनचीच भेट घेतली नाही तर क्वॉलिटी टाईमदेखील स्पेंड केलं.

मुलासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड

रामचरणने या मुलाच्या पालकांचीही भेट घेतली. या भेटीचे काही फोटो व्हायरल झाले असून राम चरण यांनी या फोटोंवर सोशल मीडिया युजर्स खूप प्रेम व्यक्त करत आहेत. या मुलाची इच्छा पूरी करण्यासाठी ‘मेक अ विश’ फौंडेशनने रामचरणची मदत केली.

Back to top button