एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब कायम; कर्मचारी संतप्त

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब कायम; कर्मचारी संतप्त

ठाणे : पुढारी वृत्तसेवा, एस. टी. कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेस पगार देण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिला आहे, मात्र, जानेवारी २०२३ या महिन्याचे नियत वेतन एस. टी. कर्मचा-यांना ७ तारीख उलटून गेले तरी मिळालेले नाही, महामंडळाने जानेवारी महिन्याचे वेतन एस. टी. कर्मचाऱ्यांना त्वरित अदा करावे, अन्यथा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने न्यायालयाचा आदेशाचा भंग केल्याबद्दल अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि सचिव हनुमंत ताटे यांनी दिला आहे.

दर महिन्याच्या ७ ते १० तारखे दरम्यान एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे न्यायालयाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात मान्य केले होते, उच्च न्यायालयाने एस. टी. कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देण्याचे आदेश देऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळ दर महिन्याला पगाराची तारीख उलटून गेल्यावरही पगार देत नाहीत, हे आता नेहमीचेच झाल्याने महामंडळ उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान करत असल्याने एस. टी. कर्मचारी आता संतप्त झाले आहेत.

अनियमीत वेतनाबाबत यापुर्वीच मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने औद्योगीक न्यायालयात दावा ( २३ ऑगस्ट २०२१) रोजी दाखल केला होता या दाव्याचा अंतरीम निकाल औद्योगिक न्यायालयानेही मुळ दाव्याचा अंतीम निकाल लागेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या देय तारखेस एस टी कामगारांना वेतन देण्याचे आदेश दिले होते. मात्र ११ तारीख झाल्यावरही कर्मचार्यांना वेतन न मिळाल्याने तातडीने वेतन द्यावे अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचीका दाखल करावी लागेल, असा इशारा शिंदे यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news