Sridevi : बोनी कपूर यांची श्रीदेवी यांच्याबद्दल मोठी घोषणा, फॅन्सना… | पुढारी

Sridevi : बोनी कपूर यांची श्रीदेवी यांच्याबद्दल मोठी घोषणा, फॅन्सना...

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीदेवी (Sridevi) बॉलीवूडच्या सर्वात सुंदर, उत्तम अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्याकाळी प्रत्येकाच्या मनावर राज करणाऱ्या अभिनेत्रीचा अचानक मृत्यू झाला. २४ फेब्रुवारी, २०१८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या फॅन्सनादेखील मोठा धक्का बसला होता. निधनानंतर त्यांच्या बायोग्राफी (Sridevi Biography) वरून खूप चर्चा करण्यात आली होती. आता श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी या बायोग्राफीबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी सांगितलं की, श्रीदेवी यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या बायोग्राफीचे नाव ‘श्रीदेवी – द लाईफ ऑफ ए लेजेंड’ असे आहे. आता त्यांच्या निधनाच्या ५ वर्षांनंतर बोनी कपूर बायोग्राफी बूक लॉन्च करतील. बोनी कपूर म्हणाले, ‘श्रीदेवी जेव्हा जेव्हा आपली कला मोठ्या पडद्यावर सादर करायच्या, तेव्हा सर्वात अधिक खुश व्हायच्या.’

हे पुस्तक श्रीदेवी यांचे जीवन दर्शवते. श्रीदेवी यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं होतं. बुधवारी वेस्टलँड बुक्सने घोषणा केली की, ते अभिनेत्रीची ऑफिशियल बायोग्राफी पब्लिश करतील.

sridevi
sridevi

श्रीदेवी यांनी आपल्या ४० वर्षांच्या करिअरमध्ये ३०० हून अधिक चित्रपट केले आहेत. त्यांनी केवळ हिंदी चित्रपटांमध्येच नाही तर तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू पसरवली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor)

Back to top button