Pathaan: 'पठान'वरून बरळले रॉनी स्क्रूवाला, युजर्स भडकल्यानंतर... | पुढारी

Pathaan: 'पठान'वरून बरळले रॉनी स्क्रूवाला, युजर्स भडकल्यानंतर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : सगळीकडे ‘पठान’चा जलवा (Pathaan) आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शनाखाली शाहरुख खानच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. अनेक रेकॉर्डदेखील तोडले आहेत. ‘पठान’ने आतापर्यंत ‘केजीएफ २’ आणि ‘बाहुबली’ यासारख्या चित्रपटांना पिछाडीवर टाकले आहे. ‘पठान’ने वर्ल्डवाईड ८८० कोटींची कमाई केलीय. परंतु, पठान ‘दंगल’ चित्रपटाला पिछाडीवर टाकेल का? ट्रेड ॲनालिस्ट आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्शच्या यांच्या ट्विटनंतर निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनीही ट्विट केले. पण, रॉनी स्क्रूवाला यांनी असं ट्विट केलं की, ज्यामुळे गदारोळ झाला. त्यानंतर स्वत: रॉनी यांनी ट्विट डिलीट केले. (Pathaan)

Ronnie Screwvala ने आपल्या ट्विटर हँडलवर तरण आदर्श यांचे ट्विट कोट करत उत्तर दिलं की, Pathaan कधीही Aamir Khan च्या Dangal चा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडू शकणार नाही. तो नेहमीच जगातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट असेल. ‘पठान’ च्या आकड्यांवरुन रॉनी स्क्रूवाला आणि तरण आदर्श यांच्यातील बातचीत नंतर युजर्स भडकले. त्यानंतर रॉनी स्क्रूवालाने आपले ट्विट डिलीट केले.

तरण आदर्श यांनी काय लिहिलं होतं?

तरण यांनी ‘पठान’ का बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले होते आणि ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘पठान आज (बुधवारी) हिंदीमध्ये KGF-२ चा लाईफटाईम बिझनेस क्रॉस करेल. याप्रकारे हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनेल. ‘केजीएफ २’ दुसऱ्या क्रमांकावर असेल. हा मोठा प्रश्न आहे की, खरंच ‘पठान’ आगामी काही दिवसांमध्ये हिंदीमध्ये ‘बाहुबली २’ ला मागे टाकेल?’

तरण आदर्श यांच्या या ट्विटला कोट करत रॉनी स्क्रूवाला यांनी लिहिलं, ‘केवळ वास्तव सांगत आहे आणि स्पष्ट करत आहे की, ‘दंगल’ जगामध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे आणि नेहमीच राहिल. केवळ चीनमध्ये या चित्रपटाने १२०० कोटींचा बिझनेस केला होता. यासाठी उत्तम राहिल की, आपण रेकॉर्ड एकदम योग्य आणि सरळ ठेवावे.’

युजर्स भडकले

रॉनी स्क्रूवाला यांच्या ट्विटनंतर युजर्सनी तत्काळ प्रतिक्रिया देणे सुरु केले. आता चर्चा ‘रेडिट’वर देखील सुरु झालीय. युजर्सनी प्रश्न उपस्थित केले की, अखेर रॉनी स्क्रूवालाने शाहरुखच्या ‘पठान’साठी असं ट्विट का केलं? एका युजरने लिहिलं की, प्रोड्यूसर रॉनी स्क्रूवाला यांना चांगले वाटले नाही की, शाहरुखच्या पठानने गती घेतलीय.

Back to top button