Vallentine Special : 'टीडीएम'मधील गाण्याने यंदाचा व्हॅलेंटाईन डे होणार स्पेशल | पुढारी

Vallentine Special : 'टीडीएम'मधील गाण्याने यंदाचा व्हॅलेंटाईन डे होणार स्पेशल

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजवर असे अनेक चित्रपट आहेत जे चित्रपटाच्या कथेसह चित्रपटातील गाण्यामुळे चर्चेत राहिलेत. (Vallentine Special ) अशातच भर घालत एक आगळावेगळा विषय घेऊन ‘टीडीएम’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीस आहेत. या चित्रपटाची खासियत म्हणजे चित्रपटातील गाणी. नुकतंच चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं व्हायरल झालं आहे. प्रेमीयुगुलांसाठी हे गाणे व्हॅलेटाईन डे स्पेशल ठरणार आहे. (Vallentine Special )

या रोमँटिक गाण्याला रोहित नागभिडे यांनी सगीत दिले आहे. गाण्याच्या ओळी डॉ. विनायक पवार यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने गाण्याला चारचाँद लावले आहेत.

‘टीडीएम’ चित्रपटातील नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी हे या गाण्यावर थिरकलेले पाहायला मिळत आहेत. ‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि ‘ स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडणार आहेत.e

‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटातील गाणी तर आजही लोकांना भुरळ पाडतायत यातच आता भर घालत ‘टीडीएम’ चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही. २८ एप्रिल २०२३ ला हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

Back to top button