Siddharth-Kiara Wedding : सिद्धार्थ-कियारा अडकले विवाहबंधनात (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणी (Siddharth-Kiara Wedding) विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांचा शाही सोहळा राजस्थानमधील जैसलमेर मधील हॉटेल सूर्यगढ येथे पार पडला. यावेळी नातेवाईक, मित्रमंडळी, पाहुणे आणि बॉलिवूडमधील दिग्गज उपस्थित होते. (Siddharth-Kiara Wedding)
सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा -कियारा आडवाणीने सिल्व्हर रंगाचे आऊटफिट परिधान केले होते. या कपलने मनीष मल्होत्राद्वारा डिझाईन केलेले आऊटफिट घातले होते. तमाम सेलेब्स प्रमाणे सिद्धार्थ आणि कियाराने आपल्या लग्नाविषयी सार्वजनिकपणे उघड केले नव्हते. या कपलचे लग्न आणि विधी दोन्ही खासगी पद्धतीने पार पडले.
ईशा अंबानीसह अनेक सेलिब्रिटींची हजेरी
सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणीच्या लग्नात जूही चावला, शाहिद कपूर, मीरा राजपूत, करण जोहर आणि अन्य सेलिब्रिटी सहभागी झाले होते. तसेच कियाराची बालपणीची मैत्रीण ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामलदेखील उपस्थित होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नानंतर हे कपल आपल्या जवळच्या मित्रांना ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहे.
- Rakhi sawant-Adil Khan : राखीच्या आरोपांनंतर पोलिसांनी पती आदिल खानला घेतले ताब्यात
- Phulwa Khamkar : नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन
- Sidharth-Kiara : ३ दिवसांत खर्च केले इतके कोटी, ‘या’ कपलनी लग्नात पाण्यासारखा ओतला पैसा
View this post on Instagram
View this post on Instagram