Rakhi sawant-Adil Khan : राखीच्या आरोपांनंतर पोलिसांनी पती आदिल खानला घेतले ताब्यात | पुढारी

Rakhi sawant-Adil Khan : राखीच्या आरोपांनंतर पोलिसांनी पती आदिल खानला घेतले ताब्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क : बी टाऊनची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi sawant-Adil Khan) चा पती आदिल खान दुर्रानीला पोलिसांनी ताब्यात घतले आहे. राखीच्या तक्रारीनंतर मुंबईच्या ओशिवारा पोलिसांनी आदिल खान ताब्यात घेतले आहे. राखी सावंतने मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये आदिल विरोधात गंभीर आरोप केले होते. तिने तशी तक्रारदेखील दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी आदिल घेतल्याची माहिती समोर आलीय. (Rakhi sawant-Adil Khan)

राखी सावंतने आदिल खान विषयी अनेक खुलासे केले आणि त्याच्यावर गंभीर आरोप केले. मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये राखी सावंतने आदिल विरोधात तक्रार दाखल करत म्हटले की, आदिलने तिचे पैसे आणि दागिने घेतले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राखीने हे देखील सांगितले की, आदिल तिला कशाप्रकारे टॉर्चर करतो. त्य़ाचबरोबर राखीने आदिलचे दुसऱ्या तरुणीशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे सांगितले होते.

Back to top button