Rakhi Sawant: राखी सावंतची पतीविरोधात तक्रार, पैसे आणि दागिने घेतल्याचा आरोप | पुढारी

Rakhi Sawant: राखी सावंतची पतीविरोधात तक्रार, पैसे आणि दागिने घेतल्याचा आरोप

पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री राखी सावंत हिने तिचा पती आदिल दुर्राणी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिने मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताना, पती आदिलवर पैसे आणि दागिने घेतल्याचा आरोप केला आहे.
राखी सावंतच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी राखीचा पती आदिल दुर्राणी विरुद्ध आयपीसी कलम 406 आणि 420 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. आदिल याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

काय म्हणाली राखी सावंत?

राखी सावंत म्हणाली, ‘लोक माझी चेष्टा करत आहेत. त्यांना हे सर्व ड्रामा वाटत आहे. त्यांच्या घरीदेखील बहिण-मुली आहेत. जर त्यांच्यासोबतही असं घडलं असतं तर त्यांनी अशीच मस्करी केली असती का? माझी आई जाऊन ४ दिवसदेखील झाले नाही, हे माझं नाटक नाहीये.’

राखीने म्हटले की, ‘तो (आदिल खान) काल माझ्यावर हसत होता. म्हणत होता की, लोक माझी मस्करी करत आहेत. तो (आदिल खान) म्हणाला की, मी हिरो बनलो आणि तू जोकर.’

मागील काही दिवसांमध्ये राखी सावंतने आदिल खान दुर्रानीसोबत आपल्या लग्नाचे फोटोज शेअर केले होते. त्यानंतर राखीने खरंच लग्न केलं आहे का, याची चर्चा सुरू झाली होती. त्याचसोबत राखीने खुलासा केला होता की, तिचं लग्न जवळपास ७ महिन्यांआधी झालं असून आदिलने तिला ही गोष्ट लपवण्यासाठी सांगितली होती. राखीने त्यावेळी आदिलचे कुण्या दुसऱ्या तरुणीसोबत अफेअर असल्याचेही म्हटले होते. खूप आव्हानानंतर आदिलने राखीसोबत आपलं नात कबूल केलं होतं.

राखीची आई जया भेडाच्या निधनानंतर आदिल राखीला सावरतानाही दिसला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा दोघे या वेगळे झाल्याचे म्हटले. राखी सावंतचे म्हणणे आहे की, आदिल खानचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे आणि आता तो घटस्फोट देण्याची धमकी देत आहे.

हेही वाचा:

Back to top button