Rakhi Sawant : राखी सावंतची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंतला (Rakhi Sawant) आंबोली पोलिसांनी अटक केली होती. पण, चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आले होते. आता राखी सावंतने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतलीय, अशी माहिती समोर आलीय. (Rakhi Sawant)
शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर आंबोली पोलिस ठाण्यात राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी राखी सावंतला ताब्यात घेतले होते. पण, चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आले होते.
शर्लिन चोप्राने केली तक्रार
शर्लिनने राखी सावंतवर गंभीर आरोप केले होते. तिने आपले आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखीवर केला होता. या तक्रारीची दखल घेत आंबोली पोलिसांनी कारवाई केली होती.