Imran Khan : साऊथ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हातात हात घालून आमिरचा भाचा स्पॉट

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खानचा भाचा आणि जाने तू या जाने ना फेम अभिनेता इमरान खान (Imran Khan) कॅमेराबद्ध झाला. यावेळी तो एकटा नव्हता तर त्याच्यासोबत होती ‘लव्ह लेडी’ साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन. इतकचं नाही तर दोघांचा हातात हात दिसला. त्यामुळे अंदाज लावण्यात येत आहे की, इम्रानच्या आयुष्यात या लव्ह लेडीची एन्ट्री झालीय. (Imran Khan)

बॉलीवूड अभिनेता इम्रान खानने चित्रपट ‘जाने तू या जाने नामधून फॅन्सची मने जिंकली होती. दीर्घकाळ लाईमलाईटपासून दूर राहणारा इम्रान अचानक कॅमेरात स्पॉट झाला. अनेक महिने तो स्क्रीनवरून गायब आहे. मागील काही काळापासून तो सोशल मीडियापासून दूरही आहे. तो त्याची पत्नी अवंतिका मलिकशी वेगळे झाल्यानंतर प्रकाशझोतात आला होता.
इम्रान खान हा आमिर खानची मुलगी इरा खानच्या साखरपुड्यात स्पॉट झाला होता. आता तो साऊथ अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन सोबत स्पॉट झाला. दोघेही एकमेकांच्या हातत हात घालून फिरताना दिसले.
- Bigg Boss 16: बिग बॉसधून लोकप्रिय स्पर्धक घराबाहेर, टॉप ५ नावे समोर
- Kiara-Sidharth wedding update : कियारा-सिद्धार्थचे ६ ला नव्हे तर ‘या’ तारखेला लग्न होणार
- Grammy 2023 : ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची पाहा यादी
View this post on Instagram