“घोडा” चित्रपटाचं पोस्टर लॉन्च, यादिवशी येणार भेटीला

ghoda movie
ghoda movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वप्न पाहणं, ती पूर्ण करण्यासाठी धडपडणं, त्या दरम्यान माणसाच्या वेगवेगळ्या वृत्ती अनुभवास येणं असा प्रवास घोडा चित्रपटात आहे. हा चित्रपट येत्या १७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विविध महोत्सवांमध्ये गौरव झालेल्या या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं.

टी. महेश फिल्म्सच्या टी. महेश आणि अनिल बबनराव वणवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच उमेशचंद्र शिंदे आणि नयन चित्ते सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन टी. महेश यांनी केलं आहे. जमीर अत्तार यांनी कथा आणि गीतलेखन, महेशकुमार मुंजाळे, जमीर अत्तार आणि निलेश महिगावकर यांनी पटकथा लेखन, संवादलेखन निलेश महिगावकर, योगेश एम. कोळी यांनी छायांकन केलं असून रोहन पाटील यांनी संकलन केले आहे.

अभिनेता कैलास वाघमारे, अर्चना खारतुडे, दिलीप धनावडे, राहुल बेलापूर, शिवराज नाळे, देवेंद्र देव, प्रफुल्ल कांबळे, वज्र पवार यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

बांधकाम मजुराचा मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलासाठी आणलेला घोडा पाहून तसा घोडा आणण्याची मागणी करतो. पण आर्थिक परिस्थिती बिकट असलेले त्याचे वडील काय धडपड करतात, त्याची गोष्ट 'घोडा' या चित्रपटात मांडण्यात आली आहे. हृदयस्पर्शी कथानक, उत्तम कलाकार, अनेक महोत्सवांमध्ये कौतुक झालेल्या घोडा या चित्रपटाविषयी आता नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news