पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफबदद्लही चर्चेत राहते. प्रसिद्ध शो 'भाभी जी घर पर हैं' मध्ये 'अंगूरी भाभी' ची भूमिका साकारून शिल्पाने फॅन्सच्या मनावर अधिराज्य गाजवलं हों. तिचा अभिनय प्रत्येकाला मोहून टाकणारा होता. आता, तिच्याबद्दल एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शिल्पाने ही मालिका सोडली आहे आणि शोच्या निर्मात्यांवर अनेक आरोप देखील केले आहेत.
जवळपास एका महिन्यापूर्वी शिल्पा शिंदेने 'मॅडम सर' मालिकेसोबत टीव्हीवर वापसी केली होती. मालिकेत तिने नैना माथुरची भूमिका साकारली होती. आता तिने ही मालिका सोडली. ती म्हणते की, आपल्या भूमिकेमुळे ती आनंदी आणि सामाधान नाहीये. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाने सांगितलं की मालिकेत तिची भूमिका मोठी हवी होती. पण, तिला कुठलीही कल्पना न देता तिची भूमिका छोटी करण्यात आली. या कारणामुळे ती या मालिकेतून बाहेर पडली. याशिवाय, शिल्पाने सांगितलं की, टीममध्ये असलेल्या दोन अभिनेत्रींसोबत तिचे पटत नव्हते.
दुसरीकडे, याच मालिकेतील मुख्य अभिनेत्री गुलकी जोशी (Gulki Joshi) ला विचारण्यात आलं होतं त्यावेळी ती म्हणाली की, हा निर्णय प्रेक्षकांवर सोडला आहे. तेच सांगतील या मालिकेसाठी कोण योग्य आहे. गुल्की म्हणाली होती, 'जर आपण आपल्या कामात प्रामाणिक नसता तर ही मालिका ३ वर्षांपासून सुरु नसती.'
यावर शिल्पा शिंदेने पलटवार केला आणि तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती आपली भडास काढताना दिसते. व्हिडिओमध्ये शिल्पा शिंदेने गुल्की जोशी बद्दल सांगितले की, तिचा मेंदू गुडघ्यात आहे.
शिल्पा शिंदे रागात म्हणते, 'मी स्त्री असल्याची मला केद वाटत आहे, कारण काही महिला 'मॅडम सर' सारखी मालिका करतात आणि दाखवून देतात की मी एक स्त्री आहे आणि माझा मेंदू गुडघ्यात आहे. काय सांगू त्यांच्या बद्दल, अशा उड्या मारून दोन महिला नको ते बोलतात…म्हणजेच इतकी मिरची लागली. तुमची मालिका इतना घाणेरडी होती? तुम्हाला तर खुश व्हायला हवं की, कोणती तरी चांगली गोष्ट होत आहे. तुम्हा लोकांना काय माहित की, फॅन्स काय असतात. येऊन चारच दिवस झालेत. या दोन महिलांना समजलं की, जेवढे पैसे हे महिनाभरासाठी घेतता, तेवढे माझे एका दिवसाचे मानधन आहे.'
व्हिडिओमध्ये शिल्पाने एकानंतर एक अनेक कमेंट्सदेखील केले आहेत. यापैकी एक कमेंट अशी की, 'मला इंडस्ट्रीवाले कधी सपोर्ट करत नाहीत. जर या प्रकारे लोक मला बदनाम करतील आणि मला स्ट्रेस देत राहतील. उद्या जर स्ट्रेसमुळे काही वाईट झालं तर प्लीज कँडल घेऊन येऊ नका. मी भूत बनून सर्वांना त्रास देईन.'