Athiya-KL Rahul : लग्नानंतर अथिया-राहुलचे पहिल्यांदाच मॅगझिन फोटोशूट | पुढारी

Athiya-KL Rahul : लग्नानंतर अथिया-राहुलचे पहिल्यांदाच मॅगझिन फोटोशूट

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुलने त्यांच्या लेटेस्ट फोटोशूटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ते बाथरोबमध्ये पोज देताना दिसत आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुलने एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे.(Athiya-KL Rahul) मात्र, यावेळी त्याने पायजमा आणि बाथरोब घातले आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल त्यांच्या लग्नात अनेक डिझायनर पोशाख परिधान करताना दिसले आहेत. आता दोघांनी एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. यामध्ये दोघेही बाथरूम लूकमध्ये दिसत आहेत. (Athiya-KL Rahul)

अथिया शेट्टी आणि केएल राहुल २३ जानेवारीला विवाहबद्ध झाले आहेत. अथिया शेट्टी आणि केएल राहुल २३ जानेवारीला विवाहबद्ध झाले. आता दोघांनी एका मॅगझीन कव्हर शूटसाठी फोटोशूट केले आहे. अथियाने तिचा लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दोघांनी लग्नाआधी हे फोटोशूट केल्याचे वृत्त आहे. लग्नानंतर रिलीज झालेला तिचा हा पहिला कव्हर फोटो आहे. या फोटोंमध्ये अथिया शेट्टी खूपच हॉट दिसत आहे.

तिने हिरवा चेक्स पायजमा आणि पांढरा बाथरोब घातला आहे. दोघांनी वोग इंडियासाठी फोटोशूट केले आहे. हे डिजिटल फोटोशूट आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघे विवाहबंधनात अडकले.

अथिया शेट्टीने हिरो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याआधी तिचे लहेंग्यातील फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये तिने एम्ब्रॉयडरी केलेला गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. दोघांनी लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by VOGUE India (@vogueindia)

Back to top button