Aryan Khan : आर्यनने मीडियाला दाखवला अॅटिट्यूड; कॅमेऱ्याकडे केलं दुर्लक्ष

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा आगामी ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र, शाहरूखसोबत त्याचा मुलगा आर्यन खानदेखील एखाद्या स्टार्सपैक्षा कमी नाही. आर्यन (Aryan Khan ) बॉलिवूड जगतात पाय ठेवण्याअगोदरच स्टार बनला आहे. आर्यनच्या प्रत्येक झलकची चाहते कायमच कौतुक करतात. मात्र, यावेळी त्याचा अॅटिट्यूड पाहून नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे.
आर्यन खान ( Aryan Khan ) अनुराग कश्यपच्या ‘ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ ( Almost Pyaar with DJ Mohabbat ) या चित्रपटाच्या स्क्रीनिंग सोहळ्याला पोहोचला होता. यावेळचा त्याचा एक व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आर्यन कॅज्युअल लूकमध्ये हँडसम दिसला.
व्हिडिओमध्ये दिसते की, आर्यनने ब्ल्यू कलरचा टिशर्ट आणि जीन्समध्ये दिसला. या स्क्रीनिंग सोहळ्यामध्ये बॉलिवूडचे एकापेक्षा एक दिग्गज स्टार्सनी पॉपाराझीच्या कॅमेऱ्याला पोझ दिली. मात्र, आर्यनने यावेळी ॲटिट्यूडपणा दाखवत कॅमेऱ्यासमोर थांबला नाही. या कार्यक्रमातून बाहेर पडताच लगेच तो त्याच्या कारमध्ये जावून बसल्याचे दिसत आहे. तर यावेळी बॉडीगार्ड त्याच्या आजूबाजूला दिसत आहेत. आर्यनचा हा अॅटिट्यूड नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही म्हणून त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान एका युजर्सने ‘किती अहंकारी आहे’ असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकाने ‘याच्यापेक्षा त्याचे वडिल शाहरूख खान चांगले आहेत’, ‘बापरे याला किती ॲटिट्यूड आहे’, असे म्हटलं आहे.
हेही वाचा :
- MAIN KHILADI : अक्षय कुमार-इमरानचा कातिल डान्स स्टेप्स (Video)
- Rasika Dugal : Mirzapur मध्ये Beena Bhabhi दिले होते जबरदस्त बोल्ड सीन
- Sai Tamhankar : फूलमती !❤️🔥; केसांत गजरा अन् सईचा रेड घागरा लूक…
View this post on Instagram