Sacred Games 3: अनुराग कश्यपची 'सेक्रेड गेम्स 3' बाबत मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Sacred Games 3) सेक्रेड गेम्सविषयी मोठी घोषणा केली आहे. चर्चित वेब सीरीज ‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा भाग येणार नाही, असे अनुरागने स्पष्ट केले आहे. अनुराग कश्यप आपला आगामी चित्रपट ‘ऑलमोस्ट लव विग डीजे मोहब्बत’चे प्रमोशन करण्यासाठी पोहोचला. यावेळी त्याने वेब सीरीज ‘सेक्रेड गेम्स’ विषयी फॅन्सना मोठी अपडेट दिली. अनुराग कश्यपला ‘सेक्रेड गेम्स ३’ बाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा, त्याने स्पष्ट केले की, तिसरा भाग येणार नाही. त्याने यामागील कारण सैफ अली खान स्टारर सीरीज ‘तांडव’ सांगितलं आहे. अनुराग कश्यपने विक्रमादित्य मोटवानी आणि नीरज यांच्यासोबत मिळून या सीरीजचे दिग्दर्शन केले आहे. (Sacred Games 3)
अनुराग कश्यप म्हणाला, ‘नेटफ्लिक्सकडे आता इतकी हिम्मत नाहीये. कारण सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स तांडववर झालेल्या वादानंतर भीती आहे.’ सैफ अली खान स्टारर ‘तांडव’ मधील एका सीन वरून खूप मोठा वाद झाला होता. हा वाद इतका वाढला होता की, सीरीजमध्ये बदल देखील करण्यात आला. ‘तांडव’ ॲमेझॉज प्राईम व्हिडिओवर रिलीज करण्यात आली होती. यामध्ये सैफ अली खानची मुख्य भूमिका होती.
अनुराग कश्यप सध्या ‘ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटामध्ये विक्की कौशल, करण मेहरा आणि अलाया एफ मुख्य भूमिकेत आहेत.
- Aryan Khan : आर्यनने मीडियाला दाखवला अॅटिट्यूड; कॅमेऱ्याकडे केलं दुर्लक्ष
- Pathaan Movie : पठाण ७०० कोटींच्या दिशेने, रेकॉर्डब्रेक कमाई सुरूच
- MAIN KHILADI : अक्षय कुमार-इमरानचा कातिल डान्स स्टेप्स (Video)