MAIN KHILADI : अक्षय कुमार-इमरानचा कातिल डान्स स्टेप्स (Video) | पुढारी

MAIN KHILADI : अक्षय कुमार-इमरानचा कातिल डान्स स्टेप्स (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोरंजन से भरपूर ट्रेलरनंतर सेल्फीच्या निर्मात्यांनी ‘मैं खिलाडी’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा खुलासा केला आहे. या गाण्याचा टीजर नुकताच जारी करण्यात आला होता. प्रेक्षक देखील गाण्याचे बोल ऐकून डान्स स्टेप्स करण्यापासून स्वत:ला थांबवू शकले नाहीत. अखेर सिनेरसिकांची प्रतीक्षा संपली आणि संपूर्ण गाणे रिलीज झाले आहे.

इमरान हाशमीने सोशल मीडियावर कॅप्शनसहित हे गाणे शेअर केलं आहे. “डान्स असो वा ॲक्शन, खिलाडी हे सर्व करतो. मैं खिलाडी तुमचा आहे. टाळ्या वाजवा…मज्जा करा…आता हे गाणे ऐका #सेल्फी २४ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहामध्ये.”

इमरानने काळा चश्मा आणि काळ्या रंगाच्या लोअर पँट सोबत सीक्विन जॅकेट घातला होता. त्याचा लूक ७० च्या दशकात घेऊन जातो. गाण्याचे अनोखे मुव्ह्ज पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, तेव्हा सर्वाधिक चर्चा इमरान हाशमीची झाली होती. आता नेटिजन्स इमरानला एका पोलिसाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सेल्फी हा चित्रपट राज मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. धर्मा प्रोडक्शनने निर्मिती केलीय. इमरान हाशमी-अक्षय कुमार पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर केलं आहे. त्यामुळे चित्रपटाची चर्चा होत आहे. चित्रपटामध्ये डायना पेंटी आणि नुसरत भरुचादेखील आहेत. हा चित्रपट २४ फेब्रुवारी, २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

Back to top button