Rasika Dugal : Mirzapur मध्ये Beena Bhabhi दिले होते जबरदस्त बोल्ड सीन | पुढारी

Rasika Dugal : Mirzapur मध्ये Beena Bhabhi दिले होते जबरदस्त बोल्ड सीन

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री रसिका दुग्गल (Rasika Dugal) मिर्जापूर (Mirzapur) वेब सीरीजमध्ये बीना त्रिपाठी (Beena Tripathi) ची भूमिका साकारून प्रसिद्ध झाली. या सीरीजमध्ये तिने आपल्या बोल्ड सीन (Bold Scene) च्या माध्यमातून खूप लोकप्रियता मिळवली. तर आपल्या बोल्डनेसच्या माध्यमातून रसिका सोशल मीडियावरदेखील खूप ॲक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक जीवनाची एक झलकदेखील पाहायला मिळते. तिचे सोशल अकाऊंट पाहिल्यानंतर समजेल की, ‘बीना भाभी’ (Beena Bhabhi) रिअल लाईफमध्ये खूप वेगळी आहे. केवळ इतकचं नाही तर तिच्याशी संबंधित या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसतील.

‘बीना भाभी’ बनून प्रेक्षकांवर मोहिनी टाकणारी रसिका दुग्गल रिअल लाईफमध्ये कशी आहे, माहिती आहे का? विशेष म्हणजे रसिका दुग्गलने मिर्जापूर सीरीजमध्ये कालीन भैय्याची पत्नी बनून धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता. रसिका रिअल लाईफमध्ये खूप वेगळी आहे. तिचे सोशल अकाऊंट पाहिले तर तिची एकदम साधी राहणीमान दिसते. ती सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह असते.

जमेशदपूर झारखंडमध्ये रसिका दुग्गलचे बालपण गेले. सुरुवातीपासूनच तिला अभिनयात रस होता. रसिका मॅथेमेटिक्समध्ये पदवीधर आहे. तिने २००४ मध्ये दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमेनमधून मॅथ्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स डिग्री घेतली आहे. इतकेच नाही तिने मुंबईतील सोफिया पॉलिटेक्निक कॉलेजमधून सोशल कम्युनिकेशन मीडियामध्ये पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केला आहे.

तिची पहिली नोकरी एका सोशल प्रोजेक्टवर एक रिसर्चमध्ये असिस्टेंट म्हणून होती. नंतर तिची अभिनयातील आवड वाढत गेली. तिने पुण्यातील एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला. तेथून पदव्युत्तरमध्ये डिप्लोमा केला.

रसिका नॅशनल ॲवॉर्ड जिंकणारा चित्रपट ‘हामिद’ मध्येही काम केले आहे. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी रसिकाला राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट समारंभात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

तिने २००८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘तहान’मध्ये नादिराच्या भूमिकेत अभिनय करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाला ११ व्या ओलंपिया इंटरनॅशनल चित्रपट फेस्टिव्हल फॉर चिल्ड्रनमध्ये युनिसेफ ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.

रसिका दुग्गलने आपल्या करिअरमध्ये बॉलीवूड चित्रपटांसोबत टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. २०१० मध्ये ती टीव्ही शो ‘पाऊडर’मध्ये दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika (@rasikadugal)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika (@rasikadugal)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika (@rasikadugal)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika (@rasikadugal)

Back to top button