कोल्हापूर: हरळी येथील ‘गोडसाखर’जवळील जिल्हा बँक शाखेवर ईडीचा छापा | पुढारी

कोल्हापूर: हरळी येथील 'गोडसाखर'जवळील जिल्हा बँक शाखेवर ईडीचा छापा

गडहिंग्लजः पुढारी वृत्तसेवा : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (दि. १) माजी मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेसह विविध शाखांवर छापा टाकला आहे. यासोबतच ‘ईडी’च्या पथकाने गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) लगत असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी सकाळी ईडीचे पथक दाखल झाल्यानंतर अन्य कोणालाही या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला होता. ‘सीआरपीएफ’च्या पथकाचे जवान या ठिकाणी बंदोबस्तासाठी नेमले होते.

‘गोडसाखर’मध्ये १०० कोटी रुपये बेनामी असल्याचा आरोप मुश्रीफांवर करण्यात आला होता. मागील महिन्यात या कारखान्याशी संबंधित ब्रिस्क कंपनीवर पुण्यात छापा टाकण्यात आला. गत महिन्यात ११ जानेवारी रोजी ‘ईडी’ने मुश्रीफांच्या कागल, पुण्यातील घरे, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यावर छापे टाकले होते. मात्र त्यावेळी ‘गोडसाखर’कडे ईडीचे अधिकारी फिरकले नव्हते. आज गडहिंग्लज कारखान्याचे कार्यस्थळ असलेल्या हरळी गावातील जिल्हा बँक शाखेवर छापा पडल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button