madhuri dixit : नेहमीप्रमाणे तू सुंदरच! काळ्या साडीत माधुरीच्या दिलकश अदा | पुढारी

madhuri dixit : नेहमीप्रमाणे तू सुंदरच! काळ्या साडीत माधुरीच्या दिलकश अदा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : धक् धक् गर्ल माधुरी दीक्षित (madhuri dixit ) या वयातसुद्धा तितकीच सुंदर आणि ॲक्टिव्ह आहे. आजही आपल्या मनमोहक अदांनी माधुरी दीक्षित (madhuri dixit ) चाहत्यांना घायाळ करत आहे. वयाच्या ५४ व्या वर्षीही माधुरीच्या रूपात तसुभरही फरक पडलेला नाही. सध्या माधुरीला आणखी एकदा साडीत पाहायला मिळत आहे.

नुकतंच माधुरी दीक्षित हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट काही फोटो शेअर केले आहेत.

तिने नवे फोटोशूट केले असून ती काळ्या रंगाच्या साडी आणि ब्लाऊजमध्ये दिसत आहे.

यासोबत माधुरीने मोकळ्या केसांसोबत कानात मोठे झुमके घातले आहेत. एवढेच नव्हे नाही तर, तिने कधी कमरेवर तर कधी स्वत: च्या गालावर हात ठेवून पोझ दिली आहे. या फोटोसोबत तिने ‘आणखी एक धक्का’ म्हणत प्रेमाचा ईमोजी शेअर केला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोला चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एकाने नेहमीप्रमाणे तू सुंदरच!, ग्लॅमरस अशी कॉमेंन्टस केल्या आहेत.

याशिवाय माधुरीने याच लूकमधून एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओत ती सुष्मिता सेनच्या ‘मैं हूं ना’ या गाण्यावर डान्स करताना दिसली आहे. हा व्हिडिओला चाहत्यांनी १.२ दशलक्षहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

याशिवाय तिने गेल्या काही दिवसांत निळ्या साडीतील फोटो शेअर केले होते. यात ती खूपच सुंदर दिसत होती.

माधुरीने पन्नाशी उलटली असली तरी आजही तिचा अंदाज घायाळ करणारा आहे. मग तिने वेस्टर्न आउटफिट परिधान केलेला असो किंवा ट्रेडिशनल. बऱ्याचदा तिला साडीत पाहायला मिळते.

माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ‘अबोध’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून माधुरीची फिल्मी कारकीर्द खूप यशस्वी ठरली.

ती शेवटची ‘कलंक’ या चित्रपटात दिसली होती.

या चित्रपटात माधुरीसोबत वरूण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर हाेते.

हेही वाचलंत का? 

Back to top button