Kushi Movie : सामंथाच्या फॅन्ससाठी बातमी! विजय देवरकोंडासोबत ‘कुशी’चे शूटिंग लवकरच | पुढारी

Kushi Movie : सामंथाच्या फॅन्ससाठी बातमी! विजय देवरकोंडासोबत 'कुशी'चे शूटिंग लवकरच

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामंथाने वरुण धवनसोबत साईन केलेल्या चित्रपटात काम करणार नाही, असे म्हटले जात असताना आता तिच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आलीय. आता विजय देवरकोंडा (Kushi Movie) स्टारर चित्रपट खुशी विषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

सामंथा रुथ प्रभू सध्य़ा तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सामंथाने अनेक प्रोजेक्ट्समधून आपेल नाव वापस घेतले आहे. तर अनेक चित्रपटांचे शूटिंग ती लवकरच सुरू करेंल. सामंथाने वरुण धवनसोबत साईन केलेल्या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. आता ती विजय देवरकोंडा स्टारर चित्रपट  ‘कुशी’मध्ये काम करेल. (Kushi Movie)

सामंथा लवकरच शिव निर्वाणद्वारा दिग्दर्शित ‘कुशी’मध्ये विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबले आहे. कारण सामंथा ‘शकुंतलम’च्या रिलीजमध्ये बिझी आहे. तिच्या आरोग्याच्या तक्रारीदेखील आहेत. पण एक नवे अपडेट समोर आले असून ‘कुशी’चे शूटिंग सामंथा पुन्हा सुरु करमार असल्याची माहिती आहे.

दिग्दर्शक शिव निर्वाणने ट्विट करत खुलासा केला आहे की, ‘कुशी’चे शूटिंग लवकरच सुरू होईल. त्यांनी प्रशंसकांना आश्वासन दिलं की, आऊटपूट खूपचं ‘सुंदर’ असेल. त्यांनी कोणत्याही तारखेचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी ट्विटमध्य़े लिहिलं, ‘कुशीचे नियमित शूटिंग लवकरच सुरू होईल, सर्व काही सुंदर होणार आहे.’ जवळपास निम्मे शूटिंग पूर्ण झाले आहे.

सामंथा सध्या ‘शाकुंतलम’च्या रिलीजसाठी सज्ज आहे. हा एक पौराणिक ड्रामा चित्रपट आहे. शाकुंतलम गुनशेखरने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट कालिदासाचे नाटक ‘शकुंतला’वर आधारित आहे. जिथे सामंथा शकुंतलाची भूमिका साकारत आहे. तर देव मोहनला राजा दुष्यंतच्या भूमिकेत पाहता येईल. ‘शाकुंतलम’ १७ फेब्रुवारी रोजी रिलीज केला जाईल.

Back to top button