Athiya Shetty-KL Rahul : अथिया-राहुलसोबत सुनील शेट्टीने लगावले ठुमके

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सुनील शेट्टीचा असा अंदाज याआधी तुम्ही कधीच पाहिला नसेल. त्याने आपली मुलगी अथिया शेट्टी आणि जावई के एल राहुलसोबत ठुमके लगावले आहेत. (Athiya Shetty-KL Rahul) २३ जानेवारी रोजी अथिया शेट्टी आणि के एल राहुल विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर अथिया प्रत्येक दिवशी आपल्या फॅन्ससाठी अनेक फोटो शेअर करत आहे. यावेळी तिने दंगा मस्ती करताना डान्सचे फोटो शेअर केले आहेत. (Athiya Shetty-KL Rahul )
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मेहंदी सेरेमनीचे फोटो दिसत आहेत, ज्यामध्ये अथिया शेट्टीचा नटखट अंदाज दिसत आहे. ती आनंदात के एल राहुलसोबत डान्स करताना दिसत आहे. यावेळी सुनील शेट्टीने मुलगी आणि जावयासोबत ठुमके लगावले. फोटोंमध्ये अथिया आणि राहुल तसेच सुनील शेट्टी यांचे खास बॉन्डिंग दिसत आहे.
राहुल आणि अथियाचा डान्स
काही फोटोंमध्ये अथिया आणि राहुल डान्स फ्लोरवर फूल ऑन मस्तीमध्ये डान्स करताना दिसत आहेत. अथिया-राहुलने सुपरहिट पंजाबी आणि हिंदी गाण्यांवर सुपर्ब डान्स केला आहे. तिसऱ्या फोटोमध्ये टायगरची बहिण कृष्णा श्रॉफसह अथिया आपल्या मित्रांसोबत चिल दिसतेय. फोटोमध्ये अथिया त्यांच्या मागे उभे राहून टाळ्या वाजवताना दिसतेय.
आयपीएल नंतर होणार या कपलचे ग्रँड रिसेप्शन
अथिया-केएल राहुलच्या लग्नानंतर वडील सुनील शेट्टीने मीडियाला मिठाईचे वाटप केले. इतकचं नाही तर सुनील शेट्टाने खुलासा देखील केला होता की, आता वेडिंग रिसेप्शन आयपीएलनंतर होईल. रिपोर्ट्सनुसार, या रिसेप्शन पार्टीमध्ये जवळपास ३ हजार पाहुणे सहभागी होतील. बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांना आमंत्रण दिले जाईल.
- Pathaan World Wide BO Collection : ‘पठान’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ५५० कोटींचा गल्ला
- Samruddhi kelakar : समृद्धी केळकर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला
- बटाटा काढणी अंतिम टप्प्यात; बाजार भावातील घसरण, शेतकरीवर्गात नाराजी
View this post on Instagram
View this post on Instagram