HBD Shreyas Talpade : कॉलेजच्या सुंदर जीएसच्या प्रेमात पडला अन्…

shreyas talpade with wife
shreyas talpade with wife

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्पा या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये मुख्य नायक अल्लू अर्जुनच्या संवादाला हिंदीमध्ये आवाज दिल्यानंतर श्रेयस तळपदे पुन्हा एकदा चर्चेत आला. (HBD Shreyas Talpade) तुम्हाला माहिती आहे का, अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या श्रेयसची लव्ह स्टोरी खूपचं खास आहे. तो चक्क आपल्या कॉलेजच्या सर्वात सुंदर जीएसच्या प्रेमात पडला होता. आज श्रेयसचा वाढदिवस, त्यानिमित्ताने जाणून घेऊया, त्याच्याविषयी आणि त्याच्या पत्नीविषयी. (HBD Shreyas Talpade)

एक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी अभिनेता म्हणून नावारुपास आलेला श्रेयसला आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याची पत्नी दीप्ती त्याच्यामागे खंबीरपणे उभी आहे. श्रेयसदेखील त्याच्या यशाचे श्रेय दीप्तीला देतो.

श्रेयस-दीप्तीची फिल्मी लव्हस्टोरी

दीप्ती कॉलेजमध्ये जीएस होती. तिथेच श्रेयसचा एक कार्यक्रम आयोजित होता. तिच्या कॉलेजच्या एका फेस्टिव्हलसाठी श्रेयसला तिथ जायचं होतं. त्यावेळी श्रेयसची क्रेझ होती. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तो दीप्तीला भेटला. पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर तो दीप्तीसोबत डेटवर गेला. मीडिया रिपोर्टनुसार, श्रेयसने दीप्तीला लग्नाविषी विचारले. तिने चक्क होकार देण्यासाठी ३ वर्षे घालवली. ही गोष्ट २००० सालातील आहे. नंतर ३१ डिसेंबर, २००४ रोजी लग्न केले.

shreyas talpade with wife
shreyas talpade with wife

कोण आहे दीप्ती?

दीप्ती ही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. तिचा आणि सिनेमाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. तरीही श्रेयससोबत राहून तिने अनेक तांत्रिक बाबी समजून घेतल्या आहेत. ती आता सहनिर्माती आहे.

कलेचा वारसा

श्रेयस तळपदेचा जन्म मुंबईत झाला. त्याने मिठीबाई कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्याला बालपणापासूनचं कलेचा वारसा मिळाला आहे.

टीव्ही ते बॉलिवूड अभिनेता

सुरुवातीला झी टीव्हीवरील काही हिंदी मालिकांमध्ये त्याने भूमिका केल्या. 'आभाळमाया', 'दामिनी'मधील भूमिकेने त्याला मराठी कलाविश्वात चांगली ओळख मिळाली.

'इक्बाल' गाजला

श्रेयसला माहिती नव्हते की, त्याची 'इक्बाल' चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नागेश कुकनूर त्यांच्या नवीन चित्रपटासाठी ऑडिशन घेत आहेत. या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तो गेला होता. छोटाशी भूमिका मिळाली तरी चालेल, असा त्याने विचार केला होता. पण, त्याची निवड झाली आणि त्याला इक्बाल या चित्रपटासाठी मुख्य भूमिका मिळाली होती.
इक्बालनंतर त्याला अनेक चित्रपट मिळत गेले. रेवती, अपना सपना मनी मनी, डोर, ओम शांती ओम, वेलकम टू सज्जनपूर, गोलमाल रिटनर्स, पेईंग गेस्ट, आशायें, गोलमाल ३, हाऊसफुल्ल २, ग्रँड ग्रँड मस्ती, गोलमाल अगेन, सिम्बा अशा असंख्य हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केले.

मराठी चित्रपट

पछाडलेला, सावरखेड एक गाव, सनई चौघडे, पोस्टर बॉईज, बाजी असे अनेक मराठी चित्रपट त्याने केले.
त्याची झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका गाजली. यामध्ये तो अभिनेत्री प्रार्थना बेहरेसोबत काम करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news