Online Rummy : ऑनलाइन रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करा – राष्ट्रवादीची मागणी | पुढारी

Online Rummy : ऑनलाइन रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करा - राष्ट्रवादीची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात मटक्यासारख्या किंवा पत्ते खेळण्यावर बंदी आहे. जर एखाद्या गावात किंवा एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचे पत्ते खेळताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे प्राविधान आहे. मात्र ऑनलाईन रमीतून (Online Rummy) सर्रास महाराष्ट्रात अवैध धंदा सुरू आहे. या धंद्याला आणखीन यशस्वी करण्यासाठी मराठी चित्रपट कलाकार जाहिरात करून लोकांना रमी खेळण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे. वाचा त्यांच्याच शब्दात.

Online Rummy : गुन्हे दाखल व्हावेत

राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष  बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित मागणी केली आहे की, ऑनलाइन रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करा. यासोबतच या कलाकारांनी आपल्या परिवारातील लोकांना रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित केले असते का? असाही सवाल उपस्थित केला आहे. काय म्हणाले वाचा,

“महाराष्ट्रात मटक्यासारख्या किंवा पत्ते खेळणार बंदी आहे. जर एखाद्या गावात किंवा एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचे पत्ते खेळताना आढळल्यास त्यांच्यावरची कठोर कारवाई करण्याचा प्राविधान आहे. मात्र ऑनलाईन रमीतून सर्रास महाराष्ट्रात अवैध धंदा सुरू आहे. या धंद्याला आणखीन यशस्वी करण्यात मराठी चित्रपट कलाकार जाहिरात करून लोकांना रमी खेळण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. यामध्ये आघाडीचे मराठी कलाकार अंकुश चौधरी, अमेय वाघ, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, मनोज जोशी, शरद केळकर, श्रुती मराठे, उमेश कामात, संतोष जुवेकर, गौरी नलवडे, आणि अमृता खानविलकर यासारख्या कलाकारांची नावे आघाडीवर आहेत तर हिंदीतील अभिनेते ऋतिक रोशन, अन्नू कपूर, कुमार सानू, शक्ती कपूर, आलोक नाथ रजा मुरदअनुप सोनी, मनोज वाजपेय, अली अजगर, शिशिर शर्मा यांचा सामवेश आहे. तर दुसरीकडे अशी सुद्धा मराठी आणि हिंदी नामांकित कलाकार आहेत की ज्यांनी समाजावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून दारू गुटखा व अशा प्रकारच्या कुठल्याही जाहिराती नाकारले आहेत ज्याने समाजाचं स्वास्थ खराब होईल. अशा अशा कलाकारांचा सुद्धा कौतुक आम्ही करतोच आहे. मात्र जी कलाकार नुसतं पैसे कमवण्याच्या उद्देशाने जर समाजाचं स्वस्त बिघडत असतील तर अशा कलाकारांवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा होनेही महत्त्वाच आहे.”

“कलाक्षेत्र आणि कलाकार हे समाजाचा प्रतिनिधित्व करतं असतात. आणि त्यांच्या कृतीवर लोक विश्वास ठेवून तशा प्रकारे वागण्याचा किंवा अनुकूरण करण्याचा प्रयत्न करत असतात. मराठी कलाकारांनी आपल्या परिवारातल्या आई, वडील, भाऊ, बहीण अशा लोकांना रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित केले असते का? अशा प्रकारचा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे. त्यांनी या विषयाकडे गंभीरतेने बघून महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना आणि परिवारांना देशोधडीला लावणाऱ्या या ऑनलाइन रम्मी जुगारावर आळा घालावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट विभागाच्या वतीने आक्रमक भूमिका घेतल्या जाईल असे सुद्धा बाबासाहेब पाटील यांनी कळवले आहे.”

कोण कलाकार आहेत जे रमीची जाहिरात करतात

  • अंकुश चौधरी
  • अमेय वाघ
  • सई ताम्हणकर
  • स्वप्निल जोशी
  • शिवाजी साटम
  • मनोज जोशी
  • शरद केळकर
  • श्रुती मराठे
  • उमेश कामात
  • संतोष जुवेकर
  • गौरी नलवडे
  • अमृता खानविलकर

हिंदी मनोरंजनविश्वातील पुढीलप्रमाणे कलाकार आहेत. जे ऑनलाईन रमीची जाहिरात करतात.

  • ऋतिक रोशन
  • अन्नू कपूर
  • कुमार सानू
  • शक्ती कपूर
  • आलोक नाथ
  • रजा मुरदअनुप सोनी
  • मनोज वाजपेय
  • अली अजगर
  • शिशिर शर्मा

हेही वाचा

 

Back to top button