ठाणे : राजकीय बंडामुळे देशात महाराष्ट्राची बदनामी; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा | पुढारी

ठाणे : राजकीय बंडामुळे देशात महाराष्ट्राची बदनामी; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

पुढारी ऑनलाईन : अस्सल शिवसैनिक माझ्यासोबत असून बाकी लांडगे विकले गेले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या राजकीय बंडामुळेच महाराष्ट्राची देशात बदनामी झाल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर आहेत. ठाकरे गटाचे खासदार राजन विचार यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच ठाणे दौरा होता. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

ठाण्यातील शिवाजी मैदानातून बोलताना ते म्हणाले, राजकारणात गलिच्छपणा असतानाही शिवसेना त्याच्या मुळ हेतूपासून दूर गेलेली नाही. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीपासून आम्ही किंचितही बाजूला गेलो नाही. विकाऊ होते ते काय भावाने विकले ते तुम्हाला माहित आहे. त्यामुळेच आज अस्सल शिवसैनिक इकडे बाकी, विकले गेले असे मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडले. तसेच ठाण्यात लवकरात लवकर जाहीर सभा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

५० खोके ही घोषणा काश्मीरपर्यंत पोहोचली आहे. संजय राऊत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत गेले होते. तिथेही ५० खोके या घोषणा ऐकायला मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button